Summer Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Summer Sowing : पुणे विभागात १६५ टक्के उन्हाळी पेरण्या

Team Agrowon

Pune Agriculture News : उन्हाळी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी ४५ हजार ६०४ हेक्टर म्हणजेच १६५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत उन्हाळी पेरणीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.

यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्‍न उद्‍भवत आहे.

त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरण्याकडे वळू लागले आहे. परिणामी, विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र होते. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला असला, तरी काही भागांत जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे चांगलेच नुकसान झाले होते.

त्यामुळे रब्बीच्या उशिराने पेरण्या झाल्या होत्या. सध्या पुणे विभागात पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरण्यांवर भर दिला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते. विभागात उन्हाळी मक्याची २० हजार ८४७, बाजरी ९५२२, उन्हाळी मूग १०६, उडीद ७६, भुईमूग १३ हजार ९४, सोयाबीन १ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सध्या विभागातील शेतकरी खरिपाच्या तयारीकडे लागला आहे. त्यातच जून महिना जवळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी शेतात शेणखते टाकण्याच्या धावपळीत आहेत. रब्बी हंगामातील काढण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी नगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील बाजरी पीकवाढीच्या व कणसाच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांची काढणी पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यामध्ये बाजरी, भुईमूग पिके वाढीच्या व कणसाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी काढणीस सुरुवात झाली आहे. भुईमूग पीक आऱ्या लागण्याच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी भुईमूग पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. उन्हाळी सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर उन्हाळी सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत असून, सांगोला तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के

नगर --- ८८८६ --- १७०७८ --- १९२

पुणे --- ११०९४ --- १४,३४२ --- १२९

सोलापूर --- ७६४५ --- १४१८५ -- १८६

एकूण --- २७,६२५ --- ४५६०४ --- १६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT