Drip Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Drip Irrigation Subsidy : ठिबक सिंचनासाठी दीड कोटीचे अनुदान प्राप्त

Irrigation Scheme : येत्या चार ते पाच दिवसांत हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : ठिबक व तुषार संचासाठी २०२२-२३ या वर्षात अनुदानापासून ९२९ लाभार्थी वंचित राहिले होते. शासनाने वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना चालू वर्षी एक कोटी ६९ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बॅँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब पीक अंतर्गत ठिबक व तुषार घटकांना लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर कृषी विभागाने चार हजार ९३५ लाभार्थ्यांना सात हजार ४२१ हेक्टरसाठी तब्बल १५ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान दिले होते.

तरीही काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांकडून वारंवार अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्या वेळी कृषी विभागाने शिल्लक अनुदानाची मागणी केल्यानंतर शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कृषी विभागामार्फत ठिबक व तुषार संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ८० टक्के अनुदान देण्यात येते.

तर अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. बहूभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेत सहभागी होतात.

गेल्या वर्षी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी जुन्नरमधील सर्वाधिक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर इंदापूर, बारामती, शिरूर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना अनुदान दिले होते.

गेल्या वर्षातील ९२९ लाभार्थ्यांना अनुदान दिलेले नव्हते. त्यासाठी कृषी विभागाने मागणी केल्यानंतर अनुदान प्राप्त झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हे अनुदान शेतकरी खात्यावर वर्ग होईल.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT