Beed News : जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीड येथील पालवन रोड परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवन इमारत उभारणीसाठी १४ कोटी ९० लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष पुढाकारातून या निधीला मंजुरीत देण्यात आली आहे.
बीड येथील पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत. उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला होता.
साधारणतः फेब्रुवारी २०२२ मध्ये हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रस्ताव मंजुरीतील अडथळ्यांची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास बुधवारी (ता. १३) कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
त्यानुसार बीड जिल्हा कृषी भवन बांधण्यासाठी तब्बल १४ कोटी ९० लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले असून, लवकरच कृषी भवनच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याचेही कृषिमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
कृषिमंत्र्यांनी प्रस्तावित कृषी भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयक निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली कृषी विषयक सर्व प्रशासकीय कामकाज करण्यास सोईस्कर होणार आहे.- बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.