Butterfly Agrowon
ताज्या बातम्या

Butterfly Species : पेंचमध्ये आढळले १२९ प्रजातींचे फुलपाखरू

Pench National Park : पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रथमच झालेल्या नागरिक-विज्ञानवर आधारित फुलपाखरू सर्वेक्षणात पाच कुटुंबांमधील १२९ प्रजातींची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Nagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Sanctuary) प्रथमच झालेल्या नागरिक-विज्ञानवर आधारित फुलपाखरू सर्वेक्षणात (Butterfly Survey) पाच कुटुंबांमधील १२९ प्रजातींची नोंद झाली आहे. याशिवाय ४९ नवीन रेकॉर्ड आणि १० नवीन श्रेणीचा समावेश आहे.

पूर्वीच्या संदर्भाचा अभ्यास केल्यानंतर नवीन रेकॉर्डची पुष्टी केली जाईल. नोंदविलेल्या महत्त्वाच्या प्रजातींमध्ये राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, कंजॉइन्ड स्विफ्ट, कॉमन नवाब, ब्लॅक राजा, ब्राऊन किंग क्रो, सायकी, टेललेस पामफ्लाय, क्रिमसन रोझ, कॉमन ट्री-ब्राऊन, ग्रास डेमन, कॉमन लास्करचा समावेश आहे.

पेंच प्रकल्पात तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने पहिले फुलपाखरू सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात ११ राज्यांतील १०५ जण सहभागी झाले होते. त्यात ६० पुरुष आणि ४५ महिलांचा समावेश होता.

गुरू घासीदास विद्यापीठ, बिलासपूर, छत्तीसगड, कोटा विद्यापीठ, राजस्थान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. या सर्वेक्षणाचा उद्देश फुलपाखरांसाठी ‘बेस लाइन डेटा’ तयार करणे हा होता. तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनने सर्वेक्षणाचे नियोजन केले होते.

दरम्यान, कुटीत पतंग आणि निशाचर कीटकांचे सर्वेक्षण सुद्धा केले. या व्यतिरिक्त पीएचडी स्कॉलर प्रतीक्षा सिंग आणि टीम सदस्य तिनसा यांनी कोलितमाराच्या पेंच नदीच्या पात्रात अनेक ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेलफ्लाय रेकॉर्ड केले.

यादृच्छिक नमुना पद्धतीचा वापर

पेंचमधील सात वनपरिक्षेत्रामध्ये ६५ संरक्षण कुटींपैकी ४२ वर प्रमाणबद्ध यादृच्छिक नमुना पद्धतीचा वापर सर्वेक्षणासाठी केला होता. जानेवारी २०२२ मध्ये अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना आणि पहिल्या पक्षी सर्वेक्षणादरम्यान प्रकल्पात मांसाहारी सर्वेक्षणासाठी वापरत असलेल्या सर्वेक्षणासाठी प्रमुख बीट क्षेत्रांचा समावेश करणारे तीन सॅम्पलिंग ट्रेल्स निवडण्यात आले होते.

प्रत्येक शिबिरासाठी किमान एक फुलपाखरू तज्ज्ञ आणि एक किंवा दोन नवीन सहभागींचा समावेश संघात होता. सर्वेक्षणावेळी ‘पोलार्ड्स वॉक मेथड’चा वापर केला. हार्वर्ड ह्युमॅनिटेरिअन इनिशिएटिव्हजद्वारे विकसित केलेल्या मोफत डेटा संकलन टूलसेट, कोबो कलेक्ट या वर डेटा संकलित केला गेला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT