Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : `उजनी`त १०० टक्के पाणी

यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडला. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

सोलापूर : सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा परतीच्या पावसाचा (Rain) लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे.

सध्या धरणात शंभर टक्के (१००.४५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून आहेत.

यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडला. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे.

२५ जानेवारीपर्यंत शहरासाठी सुटणार पाणी

सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र लाभक्षेत्र प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे.

त्यानुसार सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्यानंतर पुढील दीड-दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT