
पळसदेव, ता. इंदापूर : पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Water Stock) उपलब्ध आहे. यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे.
धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे. सन २०२० पासून धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध राहत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो.
धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून आहे.
त्यामुळे दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते. धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना-माढा, दहिगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा व नदीद्वारे दिले जाते.
यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे. याच पाण्याचा वापर करुन येथील जलविद्युत केंद्रातून सुमारे तीन कोटीहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.
धरणाची पाणी साठवण क्षमता
१०० टक्के भरल्यानंतर ११७ टीएमसी
१११ टक्के भरल्यानंतर १२३ टीएमसी
मृत साठा ६३ टीएमसी
उपयुक्त साठा ५४ टीएमसी
धरणात शंभर टक्के पाणीसाठा असलेली वर्षे
सन २०१०, २०११, २०१८, २०२०, २०२१, २०२२, २०२३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.