Mantralay Mumbai Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari : एका दिवसात १ लाख ८१ हजार नागरिकांनी घेतला सेवांचा लाभ

Government Scheme : अभियानांतर्गत जिल्ह्याला ७५ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन मंगळवारी (ता. ३०) करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत एका दिवसात १ लाख ८१ हजार ३७६ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट नागरिकांना अभियानांतर्गत लाभ देण्यात आल्याने अनेकांना समाधानाचे क्षण अनुभवता आले.

अभियानांतर्गत जिल्ह्याला ७५ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांकडून अर्जही भरून घेतले.

तालुकास्तरावरील शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. सकाळी ११ वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृह तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आशेने आलेले नागरिक समाधानी होऊन परतताना दिसले. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला.

नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र, विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड, निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.

सूक्ष्म नियोजनावर भर

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी शिबिराचे सूक्ष्म नियोजन केले होते. उद्दिष्टापेक्षा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गेला आठवडाभर परिश्रम घेतले.

तालुकानिहाय लाभ घेतलेली लाभार्थी संख्या

तालुका --- लाभार्थी संख्या

पुणे शहर --- १० हजार ९२९,

हवेली --- २७ हजार ४१९

मुळशी --- ३ हजार ९५०

भोर --- २८ हजार ४४२

मावळ --- ३ हजार ६८

वेल्हे --- ८ हजार ३९०

जुन्नर --- ३ हजार ५२३

खेड ---- १० हजार ८३७,

आंबेगाव --- २४ हजार २०३

शिरूर --- ३३ हजार २२३

बारामती --- २१ हजार ४३१

पुरंदर --- ५ हजार ५१७

अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड -- ४४२ शिबिराच्या माध्यमातून उद्दिष्टापेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्याचा आनंद मिळाला आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे कष्ट वाचले याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्नपूर्वक चांगले नियोजन केले. यापुढेही मोहीम स्तरावर सामान्य नागरिकांना अशाच शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असतील.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT