Tur Pest Management : तुरीवरील किडींचे एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन

शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुढे तूर साठवणुकीमध्येही अनेक किडींमुळे नुकसान होते. हे लक्षात घेता तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये तूर पिकाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.
Tur Pest Management
Tur Pest ManagementAgrowon

प्रमुख कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन (Tur Production) कमी येण्यामागे किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे नुकसान आढळते. तुरीमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुढे तूर साठवणुकीमध्येही अनेक किडींमुळे नुकसान (Pest Damage) होते. हे लक्षात घेता तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये तूर पिकाचे (Tur Crop) ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.

Tur Pest Management
Tomato Pests : टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

यांत्रिक पद्धती :

-पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.

-कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या एक फूट उंचीवर लावावेत. त्यावरून शेंगा पोखरणारी अळी व मारुकाची संख्या लक्षात येईल.

-शक्य असल्यास तुरीवरील मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. त्यासाठी झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलविल्यास अळ्या खाली पडतात. अशा अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

-पिकाच्या एक ते दोन फूट उंचीचे हेक्टरी ५० ते ६० पक्षिथांबे उभारावेत.

Tur Pest Management
Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

जैविक पद्धती :

-पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

- शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणू अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात वाढतात. परिणामी अळ्यांना रोग होऊन ५-७ दिवसांत अळ्या मरतात

Tur Pest Management
Cotton Pest : गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडींचे व्यवस्थापन

रासायनिक पद्धत :

किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यावरच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.

१. शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) : कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर २ अळ्या प्रतिमीटर ओळीत.

२. पाने गुंडाळणारी अळी व पिसारी पतंग : ५ अळ्या प्रति १० झाडे.

३. शेंगमाशी : ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा.

Tur Pest Management
Soybean Pest : सोयाबीनसह कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव

शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडीची नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २.८ मि.लि. किंवा

फ्ल्यूबेंडायअमाइड (३९.३५ एससी) ०.२ मि.लि. किंवा

इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.६६ मि.लि. किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.८ मि.लि.

टीप : वरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे.

महत्त्वाच्या टिप्स :

-पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.

-प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करावे.

-फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

-कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.

शेंगा पोखरणारी अळी :

इंग्रजी नाव -Pod borer,

शा. नाव- Helicoverpa armigera

बहुभक्षी कीड. सुमारे २०० पिकांवर (तूर, कापूस, भेंडी, टोमॅटो, सोयाबीन, हरभरा आदी) पिकांवर प्रादुर्भाव.

जीवनक्रम- अंडी, अळी, कोष व पतंग.

अळी रंगाने हिरवट पिवळसर. अंगावर तुरळक समांतर रेषा. पूर्ण वाढ झालेली अळी ४ सेंमी. लांब वर्षातून सात ते ९ पिढ्या तयार होतात.

मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळ्या, फुले, शेंगांवर घालते. चार ते सात दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. १४ ते १६ दिवसांपर्यंत पूर्ण वाढ होऊन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्टणात कोषावस्थेत जातात. कोषातून पतंग बाहेर पडतात.

जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण होतो.

नुकसान ः प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने खातात. पीक फुलोऱ्यात आल्यावर कळ्यांवर उपजीविका करतात. शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे आत ठेवून दाणे खाते. मोठ्या अळ्या दाणे पोखरून खातात.

एक अळी ३० ते ४० शेंगांना नुकसान पोहोचवते. ढगाळ वातावरण आणि जास्त प्रादुर्भावामध्ये पिकाचे २५ ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

2) पिसारी पतंग :

इंग्रजी नाव –Tur plume moth,

शा. नाव - Exelastis atomosa) :

अळी सुमारे १२.५ मि.मी. लांबीची, सुरुवातीला हिरव्या व नंतर तपकिरी रंगाची दिसते. अळी मध्यभागी फुगीर, तर दोन्ही टोकाला निमुळती असते. पूर्ण शरीरावर केस असतात. अळी अवस्था १० ते १६ दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर शेंगेंवर किंवा शेंगेंवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोष हा लालसर तपकिरी रंगाचा असतो. कोषातून ४ ते ७ दिवसांत पतंग बाहेर पडतो. या किडीचा पतंग नाजूक असतो. या किडीचा जीवनक्रम १७ ते २८ दिवसांत पूर्ण होतो.

या अळीचा प्रादुर्भाव साधारणत: पावसाळा संपल्यावर मोठ्या प्रमाणावर होतो.

अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरवातीला कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेंचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर बाहेर राहून आतील दाण्यावर उपजीविका करते.

शेंगमाशी :

इंग्रजी नाव -Pod fly,

शा. नाव - Melanagromyza obtusa

मादी शेंगमाशी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची, लांब गोलाकार असतात. अंडी ३ ते ७ दिवसांत उबल्यानंतर अळी बाहेर पडते. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून, तिला पाय नसतात. तिचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी अवस्था १० ते १८ दिवसात पूर्ण होऊन शेंगेंतच कोषावस्थेत जाते. कोषावरण तपकिरी रंगाचे असून लांब गोलाकृती असतो. कोषावरणाच्या आत कोष असून, सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असतो. पुढे तो तपकिरी रंगाचा होतो. कोषावस्था ४ ते ९ दिवसांची असून, त्यानंतर शेंगेतून माशी बाहेर पडते. अशा प्रकारे शेंगमाशीचा जीवनक्रम ३ ते ४ आठवड्यांत पूर्ण होतो.

सुरुवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेंवर दिसत नाही. मात्र वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेंत प्रवेश करून अर्धवट दाणे खाते. दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होऊन दाणे कुजतात.

पाने व फुले जाळी करणारी अळी :

इंग्रजी नाव -Spotted pod borer

शा. नाव - Maruca vitrata

या किडीची प्रौढ मादी पिवळसर रंगाची असते. ती उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घालते. अळी १४ मि.मी. लांब, हिरवट पांढऱ्या रंगाची असून, त्यावर दोन्ही बाजूंस काळे ठिपके असतात. कोष चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेला असतो. या किडीचा प्रादुर्भाव साधारणत: पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आर्द्रतेच्या वेळी आढळून येतो. ही अळी पाने, फुले, कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करते. त्यात लपून बसते. वाढ होणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते. नुकसान होते. आतमध्ये अळी पाने पोखरत राहते, त्यामुळे पानांना अन्नद्रव्ये तयार करण्यात अडचणी येतात. झाड जोमदार वाढत नाही. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी शेंगामधील अपरिपक्व दाणे फस्त करते.

वातावरणातील विविध घटकांचा समन्वय साधत एकमेकास पूरक अशा तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन होय. मशागतीय, यांत्रिक, जैविक व किमान पातळीवर रासायनिक कीटकनाशकांचा योग्य आणि पर्यावरणपूरक वापर करून किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com