उदकाचे सुख ते किती

एकनाथी भागवतात संत एकनाथ म्हणतात, ‘‘पाण्याचे सुख अवर्णनीय आहे. पाण्यामुळे माणूस क्षणात अर्थाने तृप्त होतो. खळखळणारे नदी-नाले ही ईश्‍वराची लाडकी लेकरे आहेत.
Sant Eknath
Sant EknathAgrowon

उदकाचे सुख ते किती।

सवेचि क्षणे वृषिते होती ।।

योगीया दे स्वानंद तुम्ही।

सुखासी विकृती पै नाही ।।

- संत एकनाथ (एकनाथी भागवत)

एकनाथी भागवतात संत एकनाथ म्हणतात,

Sant Eknath
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

‘‘पाण्याचे सुख अवर्णनीय आहे. पाण्यामुळे माणूस क्षणात अर्थाने तृप्त होतो. खळखळणारे नदी-नाले ही ईश्‍वराची लाडकी लेकरे आहेत. पाणी योगीजनांनाही स्वानंदाच्या अवीट तृप्तीची अनुभूती देते. सुखाचा नितांत अनुभव देते, हे सुख पाण्यासारखे नितळ, पारदर्शी आणि शुद्ध असते, त्यात कुठल्याही प्रकारचे किंतु, दोष वा विकृती नसते.’’

डोंगरदऱ्यावरील निर्झराबाबत नाथ म्हणतात,

जैसे पर्वती निर्झर।

तैसे उपकाराचे पाझर।।

सुको नेणती निरंतर ।

कृतोपकार जग केले ।। (एकनाथी भागवत)

Sant Eknath
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

पर्वतावरून वाहणारे निर्झर म्हणजे उपकाराचे मूर्तिमंत पाझर आहेत. पण माणूस छोट्याशा वैयक्तिक लाभासाठी पर्वतासारखे उपकारकर्त्यावर आघात करतो हे कृत्य कृतघ्नपणाचे आहे.

नदी वाहत जाऊन सागराला मिळते. मात्र जाताना आपल्या दोन्ही अंगाकडचा प्रदेश सुपीक, समृद्ध करते. आणि ओलावा देत माणसाला पिण्यासाठी, स्नानासाठी पाणी देते. आईच्या मायेने भरणपोषण करते. म्हणून नदीला आपल्या भारतीय परंपरेत माता असे म्हणतात.

Sant Eknath
Crop Management : शेती व्यवस्थापनाचे ऑनलाइन सल्ले उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर

आज भीषण दुष्काळाचे चटके बसत आहेत. वृक्ष तोडणे, पाणी जमिनीत न जिरवणे, पाण्याचा अयोग्य वापर, शास्त्रशुद्ध प्रामाणिक नियोजनाचा अभाव, निसर्गनियमाविरुद्ध बेजबाबदार वर्तन यामुळे ही मानवनिर्मित दुष्काळाची छाया दाटली आहे.

निसर्ग माणसाला मित्र म्हणतो पण माणूस क्षुद्र स्वार्थापोटी हे मैत्र निभावत नाही. त्यामुळे ही शोकांतिका आहे. त्यात होरपळताहेत गरीब, सर्वसामान्य लोक, आज ‘बिल्डर’ या कुळातील काही भयंकर महाराक्षस सर्व वातावरण व्यापून उरताहेत.

जंगले तोडून सिमेंटची जंगले तयार करीत आहेत. काही मूठभर धनवानांसाठी निसर्गाचा तोल बिघडवून दुसरे घर, निसर्ग घर अशा गोंडस नावाखाली सळसळत्या हिरवाईचे रूपांतर निर्जिव सिमेंटाइन करताहेत. त्यातून मिळणारे तथाकथित आनंद सुख ही सुखाची विकृती आहे.

संतांचे विचार कालातित होते. पाणी हे निसर्गाचे धन आहे. आपण आपल्याकडेच धन जसे काटकसरीने वापरतो तसेच पाणीही वापरायला हवे. पाणी असेल तरच माणसाचे उद्याचे जीवन आहे. पाणी नसेल तर ही कल्पनाच थरकाप उडविणारी आहे. विवेकपूर्ण संतविचारांची कास धरली तरच काही तरणोपाय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com