ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : ‘‘ऑनलाइन (Online) पद्धतीने शेती व्यवस्थापनाचे सल्ले (Crop Management Advisory) दर आठवड्याला मिळतात. त्याचा उपयोग करत शेतीचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. हा पर्याय उत्पादकता आणि उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरला आहे,’’ असे मत हर्षल तोंडरे (Harshal Tondare) या शेतकऱ्याने पंतप्रधानांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधताना व्यक्त केले.
वोडाफोन-आयडिया फाउंडेशन आणि सॉलिडॕरिडॕड स्वयंसेवी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट ॲग्री प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात राबविला जात आहे. या प्रकल्पात सहभागी निवडक शेतकऱ्यांशी शनिवारी (ता. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५-जी सेवेच्या उद्घाटन प्रसंगी संवाद साधला.
नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड येथील एक लाख शेतकरी या प्रकल्पासोबत जुळलेले आहेत. या शेतकऱ्यांना सेंसरबेस तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीतील आद्रता व इतर घटकांबाबत माहिती ऑनलाइन पद्धतीने दिली जाते. त्याचा उपयोग दैनंदिन शेती व्यवस्थापन पद्धतीत शेतकरी करीत आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांना दर आठवड्याला ऑनलाइन पद्धतीने तांत्रिक ॲडव्हायझरी देखील पुरविली जाते.
या प्रकल्पातील शेतकरी हर्षल तोंडरे, महिला शेतकरी रीता गावंडे या दोघांनी नागपुरातून ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधानांशी संवाद साधला. या वेळी सॉलिडॕरिडॕड संस्थेचे नागपूर येथील प्रमुख अनुकूल नागी उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत राजनकर, महेश सोलासे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.