कृषी सल्ला (रब्बी पिके, हळद, केळी, भाजीपाला, चारा पिके)

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आणि करडई या पिकांची लवकरात लवकर काढणी करून त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेली असल्यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
Due to rainy weather, turmeric should be harvested as soon as possible and stored in the right place
Due to rainy weather, turmeric should be harvested as soon as possible and stored in the right place
Published on
Updated on

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आणि करडई या पिकांची लवकरात लवकर काढणी करून त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेली असल्यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.  रब्बी पिके

  • काढणी अवस्था.
  • वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आणि करडई या पिकांची लवकरात लवकर काढणी करून त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेली असल्यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. 
  • हळद 

  • काढणी अवस्था.
  • सध्याच्या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. सध्याची अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघड्यावर साठवण करू नये.
  • केळी

  • वाढीची अवस्‍था.
  • वादळी वारे, पाऊस व गारपिटीची शक्यता लक्षात घेता केळी बागेत झाडे कोलमडणे, पाने फाटणे इ. प्रकार होऊ शकतात. अशा ठिकाणी 
  • केळीची झाडे कोलमडू नयेत, यासाठी झाडास आधार द्यावा. 
  • भाजीपाला

  • काढणी अवस्‍था.
  • पावसाळी वातावरणामुळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 
  • नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) मायक्लोब्यूटॅनील (१० % डब्ल्यूपी) १ ग्रॅम.
  • चारा पिके

  • साठवण  
  • सध्याच्या पावसाची स्थिती व अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कडबा पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवणक्षमता कमी होते. भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
  •  - कैलास डाखोरे,  ७५८८९९३१०५ (मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com