Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

YCMOU: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल ‘अर्थ डे नेटवर्क’ (आशिया) तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिनी द्वितीय क्रमांकाचा ‘स्टार कॅम्पस अवॉर्ड’ मिळाला.
Star Campus Award
Star Campus AwardAgrowon
Published on
Updated on

Nashik News: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील शाश्वत व मूलभूत योगदानाबद्दल ‘अर्थ डे डॉट ओआरजी’या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्नित ‘अर्थ डे नेटवर्क’(आशिया) तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सोमवारी (ता.२८) द्वितीय क्रमांकांच्या ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठात जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे प्रतिनिधी विनायक साळुंखे यांच्याकडून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.या वेळी व्यासपीठावर पद्मश्री विजेते चैत्राम पवार, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ.संजीवनी महाले,राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धेचे डॉ.राहुल मुंगीकर,डॉ.चेतना कामळस्कर,गोपाळ पाटील यांची विशेष उपस्थिती होती.‘

Star Campus Award
Star Fruit Benefits : रोज एक स्टार फ्रूट उन्हाळात पाण्याची कमतरता जाणवरणारच नाही

अर्थ डे नेटवर्क’ (आशिया) तर्फे देशातील शैक्षणिक संस्थासाठी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल २०२५ रोजी ‘आपली शक्ती-आपला ग्रह’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण पूरक कार्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची द्वितीय क्रमांकाच्या ‘स्टार कॅम्पस अवार्ड’ साठी निवड करण्यात आली. 

...या कार्यामुळे झाला गौरव

संस्थेने विद्यापीठाचा दीडशे एकरवरील वैविध्यपूर्ण वृक्ष संपदा व हरित परिसर,जवळपास साडेतीनशे सौर पॅनेलचा वापर सुरू करून केलेली वीज बचत व वीज बिलातील कपात, कमी कार्बन उत्सर्जन व अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वाढीव वापर,पावसाचे पाणी साठवणूक व्यवस्था, मधुमक्षिका पालन, वनशेती, स्वच्छता आदी मुद्दे प्राधान्याने अधोरेखित करत विद्यापीठाचा गौरव केला आहे.यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com