YCMOU : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात मत्स्यपालन आणि श्वानपालन अभ्यासक्रम

Maharashtra Open University : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रमाणपत्र व श्वानपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू केला जाणार आहे.
Fish Farming
Fish Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रमाणपत्र व श्वानपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू केला जाणार आहे. या शिक्षणक्रम अंमलबजावणीसाठी राज्यातील पात्र व इच्छुक संस्थांकडून अभ्यासकेंद्र मंजुरीसाठीचे प्रस्ताव मागविले होते. त्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २५) मुदत दिली होती. त्यास मुदतवाढ दिली असून आता ७ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील.

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी महाराष्ट्रातील मत्स्य महाविद्यालये, मत्स्य विज्ञान विभाग असलेली महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, मत्स्यपालन केंद्रे किंवा ज्यांच्याकडे बी.एफ.एस्सी. पात्रताधारक तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते अर्ज करू शकतात.

श्वानपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, पशुधन व्यवसाय व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, पशुवैद्यकीय विभाग आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शासनमान्य श्वानपालन आणि प्रशिक्षण केंद्र ज्यांच्याकडे विभाग असलेली महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, कृषी मत्स्यपालन केंद्रे किंवा ज्यांच्याकडे बी.व्ही.एस्सी. किंवा एम.व्ही.एस्सी. पात्रताधारक शिक्षक असलेल्या संस्था अर्ज करू शकतील.

Fish Farming
Fish Farming : महिला बचत गटांना आता मत्स्य व्यवसायात संधी

दोन्ही शिक्षणक्रम सुरू करण्यास इच्छुक संस्था नोंदणीकृत असाव्यात, महाविद्यालय किंवा प्रशिक्षण केंद्र संबंधित विषयातील उच्चतम शासकीय संस्था किंवा विद्यापीठाशी संलग्नित असावे. शिक्षणक्रम सुरू करण्यास इच्छुक असल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या सहीनिशी प्रस्तावासमवेत जोडलेले असावे.

Fish Farming
Cage Fish Farming: पुण्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन कार्यशाळा; मत्स्यव्यवसायात नवे तंत्र!

संस्थेकडे किमान ४० विद्यार्थीक्षमता असलेली वर्गखोली, वाचनालय व सभागृह, संबंधित विषयाचे किमान ३ ते ५ तज्ज्ञ शिक्षक, एक केंद्र रोखपाल, एक केंद्र सहाय्यक आणि एक शिपाई, निवास व्यवस्था, एक वैद्यकीय चाचणी खोली, प्रात्यक्षिकसाठी पुरेशी जागा, संबंधित विषयास अनुसरून आवश्यक वैद्यकीय साहित्यसामुग्री असणे अपेक्षित आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी प्रती अभ्यासकेंद्र पडताळणी शुल्क १५ हजार रुपये तर श्वानपालन प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी पाच हजार रुपये आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा विद्यापीठ कृषी विज्ञान विद्याशाखेच्या ०२५३ – २२३०३४० या दूरध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, संबंधित प्रस्ताव पाठविण्यास येत्या ७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रस्ताव हा संचालिका, कृषी विज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गंगापूर धरणाजवळ, नाशिक या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह दस्तऐवज स्वरूपात (हार्ड कॉपी) पाठवावेत, असे आवाहन विद्यापीठ कृषी विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ. माधुरी सोनवणे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com