Women Empowerment: महिलांनी कौशल्य ओळखून संधी शोधण्याची गरज!

Women Leadership: महिलांनी आपल्या कौशल्याची ओळख करून योग्य संधी शोधण्याची गरज आहे, असे मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी नोंदवले. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नारीशक्तीच्या सन्मान’ या कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी महिलांनी सक्षम बनून इतर महिलांना प्रेरित करण्याचे आवाहन केले.
Sakal
SakalAgrowon
Published on
Updated on

Nashik News: महिलांचा पुढाकार आणि सहभागातून कामे यशस्वी होतात. मात्र महिलांनी आपल्यातील कौशल्य, सक्षमता ओळखून संधी शोधण्याची गरज आहे. मार्ग काढायचा प्रयत्न केल्यास उत्तर मिळतेच असा मौलिक सल्ला ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिला.

समाजात आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वेगळेपण सिद्ध करणाऱ्या नारीशक्तीला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. ७) ‘सकाळ’तर्फे सलाम करण्यात आला. ‘नारीशक्तीच्या सन्मान’ हा कार्यक्रम शहरातील गोखले कॅम्पसमधील गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल प्रमुख पाहुणे, तर ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर उपस्थित होते.

Sakal
Women Empowerment : सशक्तीकरणातून महिलाच पेलतील कृषी क्षेत्रातील आव्हाने

प्रतापराव पवार म्हणाले, की ग्रामीण भागातून १५-२० महिला सामाजिक समस्या घेऊन एकदा मला भेटायला आल्या होत्या. गावात पाण्याची समस्या असल्याने लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. त्या वेळी सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून त्यांनी एकत्र येऊन पूर्ण गावाला एकत्र केले आणि एका वर्षात जनसंधारण कामातून २० कोटी लिटर पाणी साठवले. याच कामातील सहभागी महिला सर्व महिला नंतर ग्रामपंचायतीत निवडून आल्या.

Sakal
Women Empowerment: विटनेरमध्ये महिलाच मालकीण ! ग्रामपंचायतीपासून शेतजमिनीपर्यंत सगळं महिलांच्या नावे

महिला एकत्र येऊन समाजातील प्रश्‍न सोडवू शकतात. आमच्या कुटुंबातही आईने जबाबदाऱ्या व काही निर्णय घेतले. तिच्या प्रेरणेतून आम्ही भावंडं घडलो, असे नमूद केले. मित्तल म्हणाल्या, की महिलांचा संघर्ष नेहमी प्रेरणादायी राहिला आहे.महिलांनी पुढे आल्यास बदल होतो. तर, एका स्त्रीने इतर स्त्रियांना मदत केल्यास समाज जलद गतीने पुढे जाईल. त्यासाठी कुणाची वाट न बघता स्वत:ला सक्षम बनवून इतरांना महिलांना प्रेरित करावे, असे आवाहन डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

...यांचा झाला सन्मान

उन्नती कोठावदे, संगीता पिंगळे, रेखा नाडगौडा, आश्‍विनी देवरे, हर्षदा सावंत, अनुराधा सोनवणे, राजेश्‍वरी आणि भुवनेश्‍वरी शेट्टी भगिनी, कौसल्या पवार, शर्मिला साळी, तन्वी चव्हाण-देवरे, ईश्‍वरी दसककर, डॉ. वैष्णवी नेहे, मीना दाणी, आशा शिंदे, कोमल कोठावदे, सुमनबाई डमाळे, रश्मी यादव, रेखा जगदाळे, ज्योती जगताप, संपदा फडके, स्वाती दळवी, लीना शिंदे, आरती हरिदास, चित्रा राऊत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com