Women Empowerment: विटनेरमध्ये महिलाच मालकीण ! ग्रामपंचायतीपासून शेतजमिनीपर्यंत सगळं महिलांच्या नावे

100% Women Leadership : जळगाव जिल्ह्यातील विटनेर गावाने महिला सशक्तीकरणाचा आदर्श घालून दिला आहे. १९९० पासून या गावात ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था आणि शेतजमिनींच्या मालकीवर महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १००% महिलांची ग्रामपंचायत, शेतजमिनींची मालकी आणि सहकारी संस्थांमध्ये महिलांची निवड यामुळे गावाला शासनाकडून गौरवही मिळाला.
Women in Governance
Women in GovernanceAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: गावातील घरे व शेतजमिनीची मालकी महिलांच्या नावे करण्यासह कुठलेही महिला आरक्षण नसताना ग्रामपंचायतीसह विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत १०० टक्के महिलांची निवड करण्याचे धाडसी व प्रगतिशील प्रयत्न १९९० ते २००० या कालावधीत विटनेर (ता. चोपडा, जि. जळगाव) या गावात झाले. या प्रयत्नांचे कौतुक शासनातील तत्कालीन प्रमुख, नेते आदींनी करून गावाचा बहुमानही वाढविला.

विटनेर तापी नदीकाठी वसलेले सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. अठरापगड जातीची मंडळी गावात आहे. जलसाठे मुबलक असून, केळी, पपईच्या शेतीत अग्रेसर आहे. १९८९-९० मध्ये गावाची सत्ता महिलांच्या ताब्यात देण्यात आली. गावातील जाणत्या मंडळीने त्यासाठी पुढाकार घेतला.

Women in Governance
Women Entrepreneurship: नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना नवी बाजारपेठ!

काहींचा विरोध होता. त्यामुळे मतदान झाले आणि ग्रामपंचायतीत १०० टक्के महिलांचा विजय या वर्षी झाला. महिलांचे नेतृत्व इंदिराताई पाटील यांनी केले. सुभाबाई कोळी या सरपंच तर इंदिराताई पाटील या उपसरपंच झाल्या. या निवडीनंतर गावात महिला अधिकार, सशक्तीकरणासाठी अभियान सुरू झाले.

Women in Governance
Women Success Story: अन्नप्रक्रिया ते हर्बल प्रॉडक्ट्स – एका गृहिणीचा यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा प्रवास!

यानंतर आणखी दोन वेळेस ग्रामपंचायतीत १०० टक्के महिलाराज आले. यासोबत शेतीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतही २०१६ मध्ये १०० टक्के महिला संचालक किंवा सदस्य बिनविरोध निवडून आल्या. यातून प्रगतीही झाली.

घरे, जमिनीची मालकी महिलांची

गावातील १०० टक्के घरांची मालकी महिलांची आहे. महिलांच्या नावे घरे करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या किंवा महिला नेतृत्वाच्या पुढाकाराने झाले. २००५ मध्ये इंदिराताई पाटील सरपंच असताना हे सत्कार्य झाले. तसेच त्यापूर्वी किंवा १९९० मध्ये गावातील सुमारे १२५ जणांनी आपल्या शेतजमिनी आपल्या पत्नी किंवा अर्धांगिनींच्या नावे करून महिला सशक्तीकरणास बळ दिले. गावातील विविध प्रयत्न, महिला विकासाची कामे याची दखल घेऊन नागपूर येथे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या हस्ते गावाचा ज्योतीबा गाव पुरस्काराने सत्कार झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com