
Women Leadership In Rural Development : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून महिला केंद्रित समुदायांच्या माध्यमातून विकासाचे नियोजन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये गाव पातळीपासून स्वयंसाह्यता गटाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या ग्रामसंघ आणि प्रभाग संघ अशी एकत्रितपणे विविध घटक करण्यात येत आहे. उमेद ही गरीब महिलांच्या उन्नतीसाठी असलेली केंद्र पुरस्कृत योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा एक भाग असलेली उमेद ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे.
महिलांचे स्वयंसाह्यता समूहात संघटन
स्वयंसाह्यता समूह बांधणी
राज्यात आजपर्यंत एकूण ५,८९,३५० स्वयंसाह्यता गट स्थापन झाले आहेत. राज्यातील ५९ लाख ५० हजार ६१९ कुटुंब यात सहभागी झालेले आहेत.
गावस्तरावरील स्थापित सर्व स्वयंसाह्यता गटांचा समुच्चय म्हणजे ग्रामसंघ. त्यांच्या समुच्चय (फेडरेशन) म्हणजे प्रभाग संघ. ग्रामसंघाची संख्या एकूण ३०,८५४ असून १,७८८ प्रभाग संघ स्थापन झाले आहेत.
क्षमता बांधणी आणि अर्थसाह्य
स्वयंसाह्यता गटांना क्षमता बांधणी सोबतच खेळते भांडवल निधी, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी आणि व्यवस्थापन निधी असा निधी देण्यात येतो. यामध्ये राज्यभरामध्ये देण्यात आलेला खेळत्या भांडवलाची इतर निधीची तपशीलवार माहिती खालील प्रमाणे आहे.
खेळते भांडवल निधी ४५७७८.८४ लाख
समुदाय गुंतवणूक निधी ८०८२३ लाख
जोखीम प्रवणता निधी ५८३० लाख
व्यवस्थापन निधी ८८५८.१८ लाख
मानवी संसाधन
स्वयंसाह्यता गटांचे संचालन आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी सुमारे ५४ हजार ५७० समुदाय साधन व्यक्ती या राज्यभरातून तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची नियमितपणे क्षमता बांधणी जिल्हा अभियान कक्षामार्फत आणि तालुका अभियान कक्षामार्फत नियमितपणे होत असते.
स्वयंसाह्यता गटाचा जवळपास संपूर्ण कार्यभार हा संगणकाच्या माध्यमातून चालविण्यात येतो, ही एक उल्लेखनीय बाब आहे.
बँकाकडून कमी व्याजात कर्ज
गटांसाठी अनुदान नसून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर व्याज अनुदानात देण्यात येते.
प्रत्येक स्वयंसाह्यता गटाला त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याच्या श्रेणीकरणानुसार बँकांकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध होते.
महाराष्ट्रामध्ये एकूण आठ लाख पासष्ट हजार ७९७ स्वयंसाह्यता गटांना कर्ज मिळाले आहे.
बँकेकडून कर्ज मिळाल्याची रक्कम १४२७३७ लाख रुपये इतकी रक्कम कर्ज रुपामध्ये स्वयंसाह्यता गटांना वितरित करण्यात आलेली आहे.
बँक सखी
स्वयंसाह्यता गटांना बँकेशी जोडणे आणि त्यांना बँकेचे व्यवहार सुलभ करून घेण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून सुमारे ३०८२ बँक सखी कार्यरत आहेत. त्यांची ही क्षमता बांधणी
नियमितपणे होत असते.
गटांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल विमा योजना यासारख्या योजनांची अंमलबजावणी होते आहे. (सर्व आकडेवारी उमेद अभियानाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झालेली आहे.)
महिला सरपंचांनी काय करावे?
ग्रामपंचायत ही राज्यघटनेने मान्यता प्राप्त असलेली संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे ५० टक्के ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुख या महिला आहेत.
महाराष्ट्रातील ५० टक्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे आहे. या
महिलांच्या मदतीला उमेद अभियानाची प्रचंड मोठी फळी स्वयंसाह्यता गट आणि ग्राम संघाच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. एवढी भक्कम फळी आणि मानवी संसाधने उपलब्ध झाल्यास त्याचे चतुराईने नियोजन केल्यास गाव जलस्वयंपूर्ण करता येतील.
सूक्ष्म पाणलोट घटक आणि लघू सिंचन हे माध्यम वापरून गावाला किमान दोन पिके घेता येतील. म्हणजे आठमाही पीक पद्धती अनुसरल्यास गावे समृद्ध निश्चितच होतील.
उमेद अभियानाच्या माध्यमातून उपजीविका उत्पादित केलेल्या वस्तूंचे मूल्यवर्धन करून त्यांची विक्री आणि त्याद्वारे अर्थार्जन या गोष्टी सहजपणे करता येतात. त्यासाठी गरज आहे ती ग्रामपंचायतीच्या महिला कारभाऱ्यांनी गावाच्या स्वयंसाह्यता गटांच्या प्रत्येक वाटचालीमध्ये त्यांना पूरक ठरतील असे निर्णय घेऊन त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, बैठकांसाठी लागणारे हॉल, इतर बाबींसाठी साय करावे.
ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये गाव दारिद्र्य निर्मूलन आराखड्याचा समावेश करून एकत्रितपणे गावाचे नियोजन झालेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये गावामध्ये पूर्ण कायापालट झाल्याचे लक्षात येईल.
जल व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये सुमारे १७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. हे प्रमाण काही अभ्यासकांमध्ये २५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे असे मानले जाते.
मृद् व जलसंधारण विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि उमेद अभियान आणि शासकीय योजना यांची एकत्रितपणे सांगड घातल्यास नक्की फरक दिसेल.
९७६४००६६८३ (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.