
Pune News : बचत गटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला ‘लखपती’ होत आहेत. जिल्ह्यातील बचत गटांना उभारी मिळण्यासाठी ‘बीज भांडवला’सह व्यवसाय वृद्धीसाठी विविध बॅंकांकडून कर्ज पुरवठा केला जात आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात २८० कोटी ४१ लाख ४८ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यातून पाच हजार ८६९ बचत गटांना (स्वयंसहाय्यता समूह) त्यांच्या व्यवसायात प्रगती करता आली आहे.
पुणे जिल्ह्यात गृहिणींना आर्थिक मदत देणाऱ्या बचतगटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बचत गटांना विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून कर्जवाटप करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून वेळोवेळी बैठक घेऊन कर्जवाटपासंदर्भात शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा झाला असून, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झाले आहे.
बहुतांश बचत गटांनी दूध उत्पादन, डेअरीचे पदार्थ, कुक्कुटपालन, मसाले, पापड, बॅग, लोणचे तयार करण्यावर भर दिला आहे. काही बचत गटांनी आधुनिक उपकरणे खरेदी करून त्यांचा व्यवसाय वाढवला आहे.
पूर्वी बचत गटांना २०० कोटींपर्यंतचे कर्ज देता येत होते. आता कर्जाची रक्कमही दुप्पट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे मिळते कर्ज
गट स्थापन झाल्यानंतर मूलभूत गरजांसाठी मिळते कर्ज
उत्पादन निर्मिती किंवा उपजीविकेचे स्रोत शाश्वत करण्यासाठी कर्ज दिले जाते
कर्ज देताना किमान एक ते २० लाखांपर्यंतची मर्यादा
किमान १५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते
तीन लाखांच्या पुढे प्रकल्प अहवाल द्यावा लागतो
गटाच्या स्थापनेनंतर सहा महिन्यांत कर्जास ते पात्र ठरतात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.