Women Empowerment : आत्मविश्वास, जिद्द असल्यास सर्व काही शक्य

Women's Day 2025 : महिलांनी स्वतःला कमी न लेखता जिद्द आणि आत्मविश्वास मनाशी बाळगून प्रगती करावी. स्त्रीच स्त्रीला पुढे नेऊ शकते.
Women Empowerment
Women Empowerment Agrowon
Published on
Updated on

Akola News : महिलांनी स्वतःला कमी न लेखता जिद्द आणि आत्मविश्वास मनाशी बाळगून प्रगती करावी. स्त्रीच स्त्रीला पुढे नेऊ शकते. नवीन शिकण्याची जिद्द मनामध्ये बाळगून आपण वर्तमानात जगलो पाहिजे. आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर स्त्रियांसाठी काहीही अशक्य नाही, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुहासिनी धोत्रे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मेळावा झाला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. तृप्ती बदरखे, आहारतज्ज्ञ डॉ. नीलिमा टिंगरे या होत्या. सुहासिनीताई धोत्रे पुढे म्हणाल्या, नवीन शिकण्याची जिद्द मनामध्ये बाळगून आपण वर्तमानात जगलो पाहिजे.

Women Empowerment
Women Empowerment : सशक्तीकरणातून महिलाच पेलतील कृषी क्षेत्रातील आव्हाने

स्त्रियांनी स्वतः साठी जगतांना आपले जीवन इतरांसाठी कसे प्रेरणादायी ठरेल याचा ध्यास धरूनच अशी जीवन प्रणाली अगीकारणे महत्वाचे आहे असेही सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केव्हीकेच्या गृहविज्ञान विषय विशेषज्ज्ञ कीर्ती देशमुख यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. बदरखे यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत बोलतांना वाढत्या वयासोबत शरीरात होणारे बदल, निर्माण होणाऱ्या व्याधी, त्याबाबतीत घ्यावयाची काळजी, दुर्लक्ष केल्याने होणारे अपाय व करता येण्यासारखे उपाय तसेच गर्भपात, गर्भधारणा होण्यात अडचणी व त्यावरील

Women Empowerment
Women Empowerment: महिलांनी कौशल्य ओळखून संधी शोधण्याची गरज!

उपाय याविषयी माहिती दिली. डॉ. टिंगरे यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांचे आहार व पोषण यावर भर दिला. तसेच महिलांनी दररोज आपल्या इतर कामांसोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतांना नियमित व्यायम, प्राणायम आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा असे सांगितले.

महिलांनी आपला ताण-तणाव बाजूला ठेवून सकारात्मक विचार अंगिकारून आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन केले. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्रातर्फे उमा अनिल राखुंडे आणि श्रीमती उषा सुधीर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा खांडरे यांनी केले तर उद्यानविद्या विषय विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com