Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूसदरासाठी सरकारच्या मानगुटीवर बसू

Ravikant Tupkar Crop Rate March : ‘‘गेल्यावर्षी शासनाने सोयाबीन, कापसाला भाव देण्यावरून फसवले. पण यंदा असा प्रयत्न केला तर सरकारच्या मानगुटीवर बसून भाव घेऊ.’’ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
Farmers March
Farmers MarchAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : ‘‘गेल्यावर्षी शासनाने सोयाबीन, कापसाला भाव देण्यावरून फसवले. पण यंदा असा प्रयत्न केला तर सरकारच्या मानगुटीवर बसून भाव घेऊ. आता हे आंदोलन थांबणार नाही,’’ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

Farmers March
Bhogavati Sugar Factory : भोगावती साखर कारखान्यावर पी. एन. पाटील यांच्या गटाचा 'गड आला; पण सिंह हरला'

सोमवारी (ता.२०) बुलडाण्यात कापूस-सोयाबीन दरवाढीच्या मुद्यावर आयोजित एल्गार मोर्चात ते बोलत होते. तुपकर म्हणाले, ‘‘शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. केंद्र व राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

Farmers March
Drought Condition Kolhapur : दुष्काळी तालुक्यांना अद्यापही कोणतीच मदत नाही, शेतकऱ्यांचा लक्षवेधी मोर्चा

शेतमालाला भाव का मिळत नाही, देशात सोयाबीन-कापूस उत्पादन जेथे-जेथे घेतले जाते, तेथे आंदोलन पेटवू. मागण्यांवर सात दिवसांत निर्णय न घेतल्यास २८ नोव्हेंबरला हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना होतील. २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेऊ.’’

मोर्चाला उसळली गर्दी

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर येथे आयोजित केलेल्या एल्गार महामोर्चाला हजारोंची गर्दी उसळली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कर्नाटकमधून आलेले रयत शेतकरी संघटनेचे राजू पवार, सक्षणा सलगर (धाराशिव), विठ्ठलराजे पवार (बारामती), समाधान फाटे (पंढरपूर), ॲड. राहुल घुले, गजानन कावरखे, विनायक सरनाईक, ज्ञानेश्वर खरात यांनी केंद्र, राज्य सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. सोयाबीन, कापसाला भाव द्यावा, अशी मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com