Kolhapur Drought Condition : अंबानी-अदानी मांडीवर, शेतकरी मात्र वाऱ्यावर, जुलमी पाणीपट्टी, जलमापक यंत्राची सक्ती मागे घ्या, दुष्काळी गडहिंग्लज तालुक्यातील संपूर्ण पाणीपट्टी व वीज बिले माफ करा, अशा जोरदार घोषणा देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी गडहिंग्लजमध्ये काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला.
गडहिंग्लज विभाग कृषीपंपधारक अन्याय निवारण शेतकरी संघर्ष समितीतर्फे येथील पाटबंधारे व विभागीय मायलियासर प्रांत कचेरीवर हा मोर्चा काढला. येथील गांधीनगरातील गणेश मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. पाटबंधारे व महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.
त्यानंतर प्रांत कचेरीच्या आवारात मोर्चाची सांगता झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, माजी सभापती अमर चव्हाण, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कॉ. शिवाजी गुरव, कॉ. संजय तर्डेकर यांची भाषणे झाली.
मोर्चात माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, दिग्विजय कुराडे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, बाळगोंडा पाटील, राजू मोळदी, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, अंकुश रणदिवे, शिवाजी माने सहभागी झाले होते.
पाणीपट्टी वसुली जुन्या दरानेच चालू वर्षातील कृषी पंपाच्या पाणीपट्टीची वसुली जुन्या दराने केली जाईल, असे लेखी, तर अन्य प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम यांनी दिले.
'गडहिंग्लज'चा समावेश दुष्काळी तालुक्यात झाल्याने थकीत वीज, बिलांच्या वसुलीसाठी कृषी पंपाची वीज तोडली जाणार नाही, अशी ग्वाही 'महावितरण'चे विजयकुमार आडके यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.