Sorghum Procurement: शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे उशिरा सुरू होणार? शेतकऱ्यांची चिंता वाढली!

Farmer Issues: खानदेशात ज्वारी बाजारभाव हमीभावापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मागील वर्षीप्रमाणे खरेदी केंद्र उशिरा सुरू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
Sorghum
SorghumAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: बाजारात हवे तसे दर नसल्याने खानदेशात अनेक शेतकऱ्यांना शासकीय केंद्रात ज्वारी विक्री करावी लागणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू करावी. ज्वारीची खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

Sorghum
Sorghum Research Center : भरड धान्य क्रांतीसाठी शेतकरी सज्ज ; ज्वारी संशोधन केंद्राची पुढाकार

मागील हंगामात ज्वारीची खरेदी उशिरा सुरू झाली. त्यात जेवढे केंद्र सुरू करण्याचे निर्देश होते, त्यातील निम्मेच केंद्र सुरू झाले. त्यातही ज्वारीची १०० टक्के खरेदी शासकीय यंत्रणांनी केलेली नसल्याचा आरोप सतत झाला.

ज्वारीचे दर यंदा हमीभावापेक्षा कमी आहेत. कमाल दर २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मागील वेळेसही दर परवडले नाहीत. परंतु वित्तीय अडचणी व अन्य समस्यांमुळे ज्वारीची विक्री शेतकऱ्यांना बाजारात करावी लागते. यात शासकीय ज्वारी खरेदीसंबंधीची प्रक्रिया मे मध्ये सुरू केली जाते. नोंदणी व अन्य कार्यवाहीस जून महिना उजाडतो. या कालावधीत कमाल ज्वारीची बाजारात कवडीलमोल दरात विक्री होते.

Sorghum
Sorghum Processing : ज्वारीला श्रीमंत करणारी कंपनी

जळगाव जिल्ह्यात सुमारे १० ते १२ हजार शेतकऱ्यांकडून शासकीय केंद्रात ज्वारी विक्रीसाठी नोंदणी होईल. ज्वारीची मळणी सुरू असून, शासकीय केंद्रात ज्वारीच्या खरेदीबाबतची प्रतीक्षा करीत आहेत.

मागील वेळेस गोदामे व अन्य अडचणी असल्याने जळगाव जिल्ह्यात फक्त सात खरेदी केंद्र सुरू झाले होते. ज्वारी खरेदीही रखडत सुरू होती. जळगावातील एकट्या पारोळा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना शासकीय केंद्रात ज्वारी खरेदीची प्रतीक्षा होती. यंदा वेळेत ज्वारी खरेदी सुरू करून, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील १०० टक्के ज्वारीची खरेदी शासकीय यंत्रणेने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com