Sorghum Research Center : भरड धान्य क्रांतीसाठी शेतकरी सज्ज ; ज्वारी संशोधन केंद्राची पुढाकार

Millet Crop : लोह व जस्त यांसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असलेल्या ज्वारीच्या परभणी शक्ती आणि बाजरीच्या एएचबी १२०० व एएचबी १२६९ हे जैवसंपृक्त वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच भरड धान्य लागवडीसाठी अधिक संशोधन आणि विस्तारकार्य आवश्यक आहे.
Jowar Farming
Jowar CultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्र आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत हैदराबाद येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (ज्वार व श्रीअन्न) यांच्या तर्फे अनुसूचित जाती उपप्रकल्पांतर्गत पोषक भरड धान्य लागवड या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा गुरुवारी (ता. २७) घेण्यात आली.

Jowar Farming
Jowar Fodder : दादर ज्वारीचा कडबा लवकरच उपलब्ध होणार

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, हैदराबाद येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. मधुसुधन, ज्वार पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार, डॉ. अनंत लाड आणि डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. प्रीतम भुतडा, डॉ. महेश दडके, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. गणपत कोटे, स्वाती घोडके आदी उपस्थित होते.

Jowar Farming
Jowar Farming : ज्वारी पिकात राखण करण्याची लगबग

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की लोह व जस्त यांसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असलेल्या ज्वारीच्या परभणी शक्ती आणि बाजरीच्या एएचबी १२०० व एएचबी १२६९ हे जैवसंपृक्त वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच भरड धान्य लागवडीसाठी अधिक संशोधन आणि विस्तारकार्य आवश्यक आहे.

अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामार्फत या क्षेत्राला आवश्यक आर्थिक साह्य मिळाले पाहिजे. डॉ. मधुसुधन म्हणाले, की ज्वार संशोधन केंद्रातर्फे भविष्यात दुय्यम भरडधान्यांवर अधिक प्रात्यक्षिके घेण्याची गरज आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते अनुसूचित जाती उपप्रकल्प अंतर्गत ५० लाभार्थ्यांना शेती साहित्याच्या संच वितरित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com