Eknath Shinde : द्राक्ष, डळिंब पिकांसाठी विशेष योजना आणणार

Horticulture Scheme : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतीच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी एक रुपयात पीकविमा योजना आपण आणली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

Pune News : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतीच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी एक रुपयात पीकविमा योजना आपण आणली आहे. आता द्राक्ष आणि डळिंबासारख्या फळपिकांसाठी विशेष योजना राज्य सरकार तयार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड (ता. राजगुरुनगर) येथून शनिवारी (ता. ६) झाला. या वेळी माजी मंत्री विजय शिवतरे, शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेच्या नेत्या आमदार शीतल म्हात्रे, पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde
Pomegranate Food : डाळिंबाचा जॅम, जेली, अनारदाणा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘विश्‍वासघात करून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झालेल्यांचे सरकार गेल्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने दीड वर्षात अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाईसाठीचे निकष बदलत शेतकऱ्यांना मोठी मदत केली.

हे सरकार शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिलांचे आहे. मी स्वतः शेतकरी असल्याने मला शेतकऱ्यांचे प्रश्‍न जास्त माहिती आहेत. मी घरात बसून, उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नसून, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाणारा शेतकरी कार्यकर्ता आहे. यामुळे आपण शेतकरी हिताच्या विविध योजना आणतो आहोत. यासाठी द्राक्ष आणि डाळिंबासाठी विशेष योजना लवकरत आणत आहोत.’’

Eknath Shinde
Grape Export : आपत्तींवर मात करून सांगली जिल्ह्यातून ४३८ टन द्राक्ष निर्यात

‘आपला संकल्प अब की बार ४५ पार’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनत आहे. ही महासत्ता अधिक बळकट करण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, यासाठी अब की बार ४०० पार असा नारा मोदींनी दिला आहे. तर आपला संकल्प महाराष्ट्रातून अब की बार ४५ पार असा असणार आहे.’’

‘आढळरावांच्या कामाची पोहोच पावती मिळणार’

सलग तीन वेळा खासदार असताना शिवाजीराव आढळराव तुम्ही मागील निवडणुकीत पराभूत झाले. मात्र पराभूत होऊन सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहात. तुम्ही ‘अभिनेते’ नसून खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुमच्या कामाची पोहोच पावती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com