Grape Export : आपत्तींवर मात करून सांगली जिल्ह्यातून ४३८ टन द्राक्ष निर्यात

Grape Farming : दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये ३० कंटेनरमधून ४३८ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातून गोड, रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये ३० कंटेनरमधून ४३८ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत निर्यातीस गती येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. मात्र, यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा उत्तम साधल्या आहेत.

दरवर्षी दुबई आणि सौदी अरेबियाला या दोन देशांत पहिल्यांदा निर्यात सुरू होते. त्यानंतर युरोपसह अन्य देशात निर्यातीस प्रारंभ होते. त्यानुसार दुबई, सौदी अरेबियात निर्यात सुरू झाली आहे.

Grape Export
Solapur Grape Export : सोलापुरात निर्यातक्षम द्राक्ष बागांची ‘शून्य’ नोंदणी

या देशात होते द्राक्षांची निर्यात

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू होणार आहे. सांगलीची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, सौदी अरेबिया, जर्मनी, मलेशिया, बांगलादेश आदी देशांत पाठविण्यात येतात.

Grape Export
Exportable Grape : ‘ग्रेपनेट’वर निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पाच हजार ५७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी

जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२३-२४ या वर्षात १६ हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी आतापर्यंत पाच हजार ५७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे. तासगाव तालुक्यातील सर्वाधिक निर्यात करण्यासाठी क्षेत्राची नोंदणी झाली आहे.

जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी क्षेत्र दृष्टिक्षेप

तालुका...क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज...९२४

तासगाव..१३६६

खानापूर...९७२

पलूस...९८

कडेगाव...५

आटपाडी...७२

जत...१२९६

कवठेमहांकाळ...८४८

जिल्ह्यातून द्राक्षांची दुबई, सौदी अरेबियाला निर्यात झाली आहे. जानेवारीच्या मध्यापासून युरोपला द्राक्ष निर्यात सुरू होणार आहे. जानेवारीमध्ये द्राक्ष निर्यातीला गती मिळणार आहे.
- पी. एस. नागरगोजे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com