Wheat Production : पाऊस, गारपिटीमुळे गहू उत्पादनाला फटका

Hailstorm : देशातील काही भागात नुकतेच पाऊस आणि गारपीट झाली आहे. महत्त्वाच्या गहू, मोहरी आणि हरभरा उत्पादक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

Mumbai News : देशातील काही भागात नुकतेच पाऊस आणि गारपीट झाली आहे. महत्त्वाच्या गहू, मोहरी आणि हरभरा उत्पादक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे या पिकांना फटका बसला. उत्पादकतेवर परिणाम होण्यासह काढणीलाही विलंब होऊ शकतो, असा अंदाज, उद्योग आणि सरकारच्या सूत्रांनी दिला आहे.

जगात चीननंतर भारत गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा प्रतिकूल हवामान, पाऊस आणि गारपिटीमुळे यंदाही गव्हाचे उत्पादन घटू शकते आणि गव्हाचा साठा वाढविण्याचे सरकारच्या हेतूला खो बसण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Wheat Production
Wheat Management : गहू कापणी, साठवण करताना घ्यावयाची काळजी

गेले दोन हंगाम देशातील गव्हाचे उत्पादन कमी होते. २०२२ आणि २०२३ च्या हंगामातही वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटले होते. परिणामी भारताचा गव्हाचा साठा घटला आहे. त्यामुळे यंदाचा गहू उत्पादन हंगाम भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. पण यंदाही म्हणजेच सलग तिसऱ्या हंगामात गहू उत्पादनाविषयीची चिंता कायम आहे.

सलग तिसऱ्या वर्षी गहू उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशाला भविष्यात गहू आयात करावी लागू शकते. पण लोकसभेच्या निवडणुका असल्याने सरकार लगेच हे मान्य करणार नाही, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

Wheat Production
Wheat Harvesting : गहू काढणी सुरू

गहू पिकाला (Wheat Farming) फटका बसल्याचे महत्त्वाच्या उत्पादक राज्यातून पुढे येत आहे. उत्तरेत पंजाब आणि हरियाणा तसेच मध्य भारतात मध्य प्रदेश राज्यात गहू पिकाचे नुकसान झाल्याचे दिल्ली येथील जागतिक व्यापार संस्थेच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने देशातील गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा १.३ टक्क्यांनी वाढून विक्रमी १ हजार १२० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज दिला होता. पण व्यापाऱ्यांच्या मते सरकारच्या अंदाजापेक्षा उत्पादन खूपच कमी राहील.

मुंबई (Mumbai) येथील एका मोठ्या व्यापाऱ्याने सांगितले की, केवळ एका आठवड्यातील प्रतिकूल वातावरणामुळे गहू उत्पादनात २० ते ३० लाख टनांनी घट येऊ शकते. मार्च महिन्यातही उष्णता जास्त राहण्याचा अंदाज आहे. याचा पिकावर किती परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही.

मोहरी, हरभऱ्यालाही फटका

गव्हाप्रमाणेच उत्तरेतील राज्यांमध्ये मोहरी आणि हरभरा पिकांचे उत्पादन घेतले जाते. मोहरी उत्पादनालाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला पाम तेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेल आयात वाढवावी लागू शकते.

मोहरी उत्पादन पाऊस (Rain) होण्याच्या आधीच अंदाजापेक्षा ५ टक्के कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अनेक ठिकाणी मोहरीची काढणी सुरु झाली आहे. पण आता या पावसाने काढणीला विलंब होऊ शकतो.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आमचे गहू पीक आडवे झाले. पीक जवळपास पक्व झाले होते आणि पुढील दोन ते तीन आठवड्यांत काढणीला आले असते. गारपिटीमुळे केवळ उत्पादन घटणार नाही तर गहू काढणीचा खर्चही वाढला. यंत्राद्वारे काढणी शक्य नाही त्यामुळे मजुरांकडून काढणी करावी लागणार आहे.
- मुकेश कुमार, शेतकरी, उत्तर प्रदेश

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com