Wheat Production Increased India : देशात यंदा गव्हाच्या पेरणीत वाढ झालेली आहे. सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशात विक्रमी ११.५ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशात मागच्या कित्येक वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन ठरू शकते. पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे.
मात्र, अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसल्याने उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे तूर डाळीच्या दरात सतत वाढ होत असून ते नवा उच्चांक गाठू शकतात. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयांच्या पार जाण्याचे संकेत आहेत.
रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी पेरणी झाली. पीक वर्ष २०२२-२३ (जुलै ते जून) मध्ये गव्हाचे उत्पादन सुमारे ११ कोटी टन होते. तर मागील वर्षी १०.७७ कोटी टन उत्पादन झाले. हवामान अनुकूल असल्यास यंदा गव्हाचे उत्पादन सुमारे ११.५ कोटी टन होईल, असा कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. केंद्र सरकारने यावर्षी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २,२७५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. यामुळे बहुतांश शेतकरी गहू विकतील, अशी अपेक्षा आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत गहू पीक क्षेत्रातही वाढ झाली आहे. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदा २, २७५ रुपये प्रतिक्विंटल दराने गव्हाची खरेदी होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होणे, ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. कारण 'एफसीआय'च्या साठ्यातून खुल्या बाजारात गहू वितरित केला जात होता.
आतापर्यंत ५९ लाख टन गहू खुल्या बाजारात विकला गेला आहे. गव्हाचे दर प्रति किलो पाच रुपयांनी घसरणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सध्या ३४ रुपये किलो असलेला गहू २९ रुपये तर ४० रुपये असलेला गहू ३५ रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.
विक्रमी उत्पादन होणार असल्याने गव्हाच्या किमतीत घट होणार आहे. अवकाळी पावसामुळे तुरीचे नुकसान झाल्याने मागील वर्षी ८० रुपये प्रति किलो असलेली तूर डाळ यंदा १६५ रुपये किलोवर गेली आहे. - प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.