Water Scarcity : ग्रामीण भागात ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Issue : यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात अद्याप जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील तब्बल ७८ हजार ३०४ एवढ्या लोकसंख्येला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात अद्याप जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील तब्बल ७८ हजार ३०४ एवढ्या लोकसंख्येला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. बुधवार (ता. १९)अखेर जिल्ह्यातील २५ गावे ७ वाड्या, तांडे मिळून ३२ लोकवस्त्यांवर ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण २४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गुरुवार (ता. २०)पर्यंत सरासरी १२१.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परंतु अद्याप जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे टँकरची संख्या वाढत आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांतील डोंगराळ भागात इतर तालुक्यांच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.

Water Scarcity
Water Scarcity : पावसाच्या आगमनानंतरही सातारा जिल्ह्यात टंचाई कायम

सध्या जिंतूर तालुक्यातील १६ गावे व १ वाडी, गंगाखेड तालुक्यातील १ गाव आणि ६ वाडी-तांडे, परभणी तालुक्यातील २ गावे, मानवत तालुक्यातील ४ गावे, सेलू तालुक्यातील २ गावे असे मिळून जिल्ह्यातील २५ गावे आणि ७ वाड्या, तांडे मिळून एकूण ३२ लोकवस्त्यांवर ३३ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या ५१ खेपा मंजूर आहेत. आजवर प्रत्यक्षात १ हजार १०१ खेपा झाल्या आहेत. सोनपेठ तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : बुलडाण्यात सव्वादोन लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ८ तालुक्यांतील १८३ गावांतील २४२ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात ३२ विहिरी टँकरसाठी, तर २१० विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत.

टँकर सुरू असलेली गावे, वाड्या, तांडे कंसात संख्या :

परभणी तालुका : गोविंदपूर, सारंगपूर (१).

जिंतूर तालुका : ब्राह्मणगाव, मोहाडी, वाघी धानोरा, कोरवाडी, सावरगाव, सावरगाव तांडा, चाराठाणा, भोसी, हतवतखेडा, बोरी, धमधम, सायखेडा, धानोरा, कान्हा, शेवडी, कौसडी, शिवाची वाडी (१९).

सेलू तालुका : रवळगाव, निरवाडी बुद्रुक (२),

मानवत तालुका : हत्तलवाडी, कोल्हा, सावळी, सोनुळा (४).

गंगाखेड तालुका : मसनेरवाडी, पोखर्णी तांडा, हनुमाननगर तांडा, घटांग्रा तांडा, गारमळ तांडा, लोभनाईक तांडा, बाळू नाईक तांडा, विठ्ठलवाडी, गुंडेवाडी (७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com