Water Scarcity : बुलडाण्यात सव्वादोन लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

Water Crisis : एकीकडे पावसाचा जून महिना सुरू झाला तरी बुलडाणा जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईने हाहाकार उडविलेला असून, दररोज टँकरची संख्या वाढत चालली आहे.
Water Tanker
Water TankerAgrowon

Buldana News : एकीकडे पावसाचा जून महिना सुरू झाला तरी बुलडाणा जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईने हाहाकार उडविलेला असून, दररोज टँकरची संख्या वाढत चालली आहे. १३ तालुक्यांतील या जिल्ह्यात आज सुमारे सव्वादोन लाखांवर नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागते आहे. जिल्ह्यात सध्या ७८ टँकर धावत आहेत. सर्वाधिक १५ टँकर बुलडाणा तालुक्यात सुरू आहेत.

गेल्या वर्षात अनियमित स्वरूपाचा पाऊस झाल्याने प्रकल्प भरू शकले नव्हते. खडकपूर्णासारखा मोठा प्रकल्प वर्षभरापासून कोरडा पडलेला आहे. बहुतांश प्रकल्पांची फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. याचा फटका नागरिकांना बसतो आहे. पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आटल्याने नागरिकांची स्थिती बिकट झाली. त्यामुळे मागील काही वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यात टँकरची मागणी वाढली.

Water Tanker
Water Scarcity : पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद

सद्यःस्थितीत सात तालुक्यांत ७२ गावांची तहान ७८ टँकरच्या माध्यमातून भागवली जात आहे. पावसाळा लवकरच सुरू होत असतानाही आणखी काही ठिकाणांवरून टँकरची मागणी होत आहे.

सद्यःस्थितीत बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक १५ गावात १६ टँकर धावत आहेत. याशिवाय देऊळगावराजा तालुक्यात १४ गावे, चिखली १४ गावे, मेहकर १३ गावे, मोताळा ६, लोणार २ आणि सिंदखेडराजा तालुक्यातील ८ गावात १० टँकर धावत आहेत. सुमारे दोन लाख १८ हजार ४७३ नागरिकांची तहान या टँकरच्या पाण्याद्वारे भागवली जात आहे.

Water Tanker
Water Scarcity : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई

टँकर सुरू असलेली गावे

पिंपळगाव चिलमखा, कुंभारी, हातणी, कोलारा, पिंपरखेड, वरवंड, ढासाळवाडी, वरवंड (ता. मेहकर), सातगाव भुसारी, सुरा, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड सपकाळ, डोंगरखंडाळा, सावळा, सुंदरखेड, हनवतखेड, चौथा, माळविहिर, वाकी बुद्रुक, उंबरखेड, डिग्रस बुद्रुक, सैलानीनगर, जवळा, राजू, चिंचखेडनाथ, बोथा, वाकी खुर्द, सरंबा, गोंधनखेड, बेराळा, वडाळी, काळेगाव,

मूर्ती, निंबा, लोणीकाळे, भालगाव, श्रीकृष्णनगर, अंभोरा, पारडी, घुटी, मंडपगाव, धोत्रानंदई, पिंपळगाव सराई, सैलानी, घाटनांद्रा, गोंधनखेड (गिरडा), किन्ही नाईक, हिवरा नाईक, मातमळ, पिंपळखुटा, सावरगाव माळ, किनगावराजा, सोयंदेव, चिंचोली बुद्रुक, बामखेड, पांगरीवाडी, मिस्कीनवाडी, गोमेधर, आंधई, भोगावती, टेकडी तांडा, पोखरी, बोदेगाव, गिरडा, डोणगाव, हिवरा साबळे, सावखेड तेजन, दुसरबीड, दरेगाव, नागझरी, शेंदूर्जन रामनगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com