Ratnagiri : खेडमध्ये धावणाऱ्या पाणीपुरवठा टँकर्सना ब्रेक; पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

Water Shortage Ratnagiri : यंदा राज्याच्या विविध भागात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक गावं-वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठ्यासाठी टँकर्सवर अवलंबून राहावं लागले.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा फटका राज्यातील अनेक गावांसह शहरी भागाला बसला. अनेक गावांसह शहरांना पाणीटंचाईमुळे टँकर्सवर अवलंबून राहावं लागतं आहे. अशातच राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे दमदार आगम झाले. त्यामुळे अनेक गावांसह शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या पावसाचा चांगला परिणाम दिसल आहे. येथे पावसामुळे अनेक जलस्त्रोतांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खेड तालुक्यातही पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पंचायत समिती प्रशासानाने १४ जूनपासून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्संना ब्रेक लावला आहे. तर ज्या ग्रामस्थांची मागणी असेल त्यांच्यासाठी पुन्हा प्रशासानाकडून पाणीपुरवठा केला जाईल असेही समिती प्रशासानाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने जलस्त्रोतांच्या जलसाठ्यात कमालीची घट झाली होती. त्यामुळे पाण्यासाठी सर्वसामान्यांना पाटपीट करावी लागत होती. यंदा सर्वाधीक पाणीटंचाईची झळ जिल्ह्यातील धनगरवाड्यांना बसली. जिल्ह्यातील १२२ गावे आणि २९७ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. तर २६ टँकर्सच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता.

Water Shortage
Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील १६४ प्रकल्प कोरडे

यामध्ये खेड तालुक्यातील १७ गावे आणि ४४ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. येथील धनगरवाड्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. या गावांना दोन टँकरच्या मदतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर सुकिवली-चोरद नदीतून पाण्याची उचल होत होती. सहा हजार लिटर क्षमता असणाऱ्या टँकरच्या १६४ फेऱ्या या गावांसह वाड्यावस्त्यांमध्ये केल्या जात होत्या.

आता गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये पाणी वाढले आहे. तसेच अनेक गावातील कुपनलिका आणि विहरींमध्ये देखील पाणी आले आहे. त्यामुळे सध्यातरी पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. त्यामुळे तालुक्यातील खवटी, तिसंगी, कशेडी आणि कुळवंडी ही चार गावांतील वाड्यावस्त्या वगळता अन्य गावांसह वाड्यावस्त्यांना धावणारे टँकर थांबवण्यात आले आहेत. येथील पाणीपुरवठा तूर्तास बंद करण्यात आला आहे.

Water Shortage
Water shortage Crisis : राज्याच्या अनेक भागात पाणीबाणी; धरणे आटली, मराठवाड्यासह प.विदर्भात परिस्थिती गंभीर

शहरालाही होणार नियमित पाणीपुरवठा

रत्नागिरी शहराला गेल्या चार महिन्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. तर यंदा लवकर सुरू झालेल्या पावसासह अवकाळी आणि वळवाच्या पावसामुळे शहरवासीयांच्या घशाची कोरड मिटली आहे. येथील धरणामध्ये पाणीसाठा २५ टक्क्यावरून ३१ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे रविवार (ता.१६) पासून पालिका प्रशासनाने शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाला होती. त्यामुळे चार महिन्यापासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. यावरून अनेकांनी टीका केली होती. पण आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे शहरवासीयांना योग्य पाणीपुरवठा करण्यात आम्हाला यश आले.
- तुषार बाबर (मुख्याधिकारी)

धरणांमध्ये पाणीपाठा

दरम्यान राज्यात मॉन्सूनने दमदार सुरूवात केल्याने आता राज्यातील २९९७ सर्व धरणांमध्ये देखील पाणाीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या सर्व धरणांमध्ये २०.१७ टक्के पाणीसाठा असून तो गेल्या वर्षी याचदिवशी २८.०६ टक्के होता. तर कोकणमधील सर्व ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये २३.८३ टक्के पाणीसाठा झाला असून ८ मध्यम प्रकल्पात ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तसेच लघू प्रकल्पात देखील मागील वर्षी ३९.०८ टक्क्यांच्या तूलनेत चांगाल असून तो यंदा ४२.६१ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com