Water shortage Crisis : राज्याच्या अनेक भागात पाणीबाणी; धरणे आटली, मराठवाड्यासह प.विदर्भात परिस्थिती गंभीर

Maharashtra Water shortage Crisis : वाढत्या उन्हाच्या झळा आणि धरणातील आटणारा पाणीसाठ्यामुळे राज्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : राज्याच्या वाढत्या पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य हैराण झाला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फक्त फुंकर मारण्याचे काम छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत झाले. मात्र त्यांच्याकडून कोणतीच ठोस भूमिका घेतले गेली नाही. यावरून सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून चांदा ते बांदापर्यंत पाणीबाणी आहे. सर्वाधिक फटका हा मराठवाड्यासह प.विदर्भाला बसत असून एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशेच्यावर टँकरच्या तीन तीन फेऱ्या होत आहेत. येथील कहार समाजातील हजारो मच्छीमारांच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना जायकवाडीचे पात्र सोडावे लागत आहे.

पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

पुण्याला पाणीपुरवठा हा खडकवासलाच्या साखळी चार धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या खडकवासलाच्या साखळी चार धरणात फक्त २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून शेतीसाठी देखील आवर्तन सोडले जाते. दरम्यान दौड शहराला १ टिमसी पाणी खडकवासला धरणातून सोडलं जात आहे. यामुळे येथे पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Water Shortage
Sambhajinagar/Hingoli/Pune Water shortage : संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, हिंगोली जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून येथील अनेक धरणातील पाणी आटले आहे. शहराच्या उशाला असणाऱ्या जायकवाडीत धरणात फक्त ४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून धरणाखीलील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे येथे ४३५ गावे आणि ६५ वाड्यावस्त्यांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. येथे सध्या ७०८ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून ही अख्या मराठवाड्यात सुरू असणाऱ्या टँकरच्या अर्धी आहे. येथे पाणीटंचाईची इतकी भीषणता आहे की एका टँकरच्या तीन तीन फेऱ्या होत आहेत. तर धरणातील पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केल्याने शेतातील उभे पीक वाळले असून जणावरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यादरम्यान जायकवाडीत धरणच आटल्याने येथील कहार समाजातील हजारो मच्छीमारांच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील मच्छिमार अडचणीत आला आहे. तर आटणाऱ्या जलसाठ्यामुळे मासेच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांना रोजंदारीवर कामावर जाण्याची वेळ आली आहे.

सुखना धरणही आटलं

यंदा राज्याच्या अनेक भागातील धरणांमधील पाणीसाठा घटत चलला असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुखना धरणही आटले. यामुळे वाळवंटातील जमिनीप्रमाणेच येथील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. सध्या येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून येथे फक्त मृतसाठा शिल्लक आहे.

Water Shortage
Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणूक कामात व्यस्त

भंडाऱ्यात उष्णतेच्या लाटेचा कहर

भंडाऱ्यात उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळत असून येथे वाढत्या गरमीमुळे सर्वसामान्य हैराण झाला आहे. मात्र शेतकरी आपल्या खरीपाच्या कामात गुंतला असून भंडाऱ्यात यंदा १ लाख ९८ हजार खरीपाची लावगवड होण्याचा अंदाज आहे.

केवळ २० प्रकल्पातच पाणीसाठा

एकीकडे मराठवाड्यात तीव्र पाण्याची कमतरता भासत असून बीडमधील १२२ प्रकल्पापैकी केवळ २० प्रकल्पातच पाणीसाठा शिल्लक आहे. येथील बिंदूसरा प्रकल्पात केवळ ५ टक्के शिल्लक असून प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र परळीच्या नागापूर धरणात ५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असूनही फक्त प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे नागरीकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. येथे प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे ८ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

सांगली पशुधन संकटात

राज्यातील विविध जिल्ह्यांना पाणीसंकटाला सामोरं जावं लागत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील पाणीदार जिल्ह्यातील एक सांगलीत मात्र दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. येथील जत तालुक्यात दुष्कसदृश्य स्थिती असून तालुक्यातील साडे तीनलाख पशुधन संकटात आले आहे. येथे हिरव्याचाऱ्याची कमतरता असून उपलब्ध चाऱ्याचे दर भडकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पशूधन कसे सांभाळावे अशी चिंता लागली आहे.

Water Shortage
Water Crisis : मराठवाडा की टँकरवाडा? आठ जिल्ह्यातील १,७३४ गाव-वाड्यांना टँकरचा आधार; धरणांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा

नाशिकमध्ये पाणीपुवठा बंद

नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यात देखील भीषण पाणीबाणी सुरू झाली असून नाशिक शहराला आज पाणीपुवठा होणार नाही. हा पाणीपुरवठा जलवाहिन्यांच्या दुरूस्थितीसाठी बंद राहणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. यादरम्यान नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला असून येथे २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पुढील दोन महिने पाण्याचे नियोजन करावे लागणार असून पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या नाशिकच्या ३४८ गावे ८७२ वाड्यावस्त्यांवर १४ सरकारी आणि ३५६ खासगी असे ३७० टँकरने पाणीपुरठा केला जात आहे.

प. विदर्भात भीषण पाणी टंचाई

प. विदर्भातील बुलढाणा, अमरावतीला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसत असून येथील ८६ गावांमध्ये ९१ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. तर धुळे जिल्ह्यात देखील स्थिती गंभीर बनली असून येथील लघू आणि मध्यम प्रकल्पात पाण्याची मोठी घट झाली आहे. लघू आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा यंदा १६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे येथे देखील पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हिंगोलीत नद्या कोरड्या ठाक

जिल्ह्याला वरदान ठरलेल्या पैनगंगा, कयाधू आणि पुर्णा नदीचे पात्र कोरडे ठाक पडले आहे. यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच धुळ्यात देखील पाणी टंचाई सावट गडद होत असतानाच येथील डेडरगाव तलावात फक्त २० दिवस पाणी पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com