Water Storage : येलदरीत २७.१९ टक्के पाणीसाठा

Yeldari Dam : येलदरी धरणामध्ये मंगळवारी (ता. २५) सकाळी ८ वाजता २२०.२५१ एमएमक्यूब (२७.१९ टक्के) तर त्याखालील सिद्धेश्‍वर धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक होता.
Yeldari Dam
Yeldari DamAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये मंगळवारी (ता. २५) सकाळी ८ वाजता २२०.२५१ एमएमक्यूब (२७.१९ टक्के) तर त्याखालील सिद्धेश्‍वर धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक होता.

यंदाच्या पावसाळ्यात आजवर धरणक्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे येलदरी तसेच सिद्धेश्‍वर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. पाणीपुरवठा योजना, बाष्पीभवन आदी कारणामुळे या दोन धरणांतील पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

Yeldari Dam
Dam Water Stock : पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत साडेसहा टीएमसी पाण्याची आवक

२०२३ च्या पावसाळ्यात पाणलोटात अत्यंत कमी पाऊस झाला. परिणामी, येलदरी धरणातील पाण्यासाठ्यात केवळ २.५ टक्के वाढ झाली होती. यंदा १ जून २०२४ पासून आजवर धरणक्षेत्रात १३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत ०.२०७ एमएमक्यूब, तर यंदा एकूण ९.५६० एमएमक्यूब पाण्याचा येवा झाला.

गतवर्षी (२०२३) या तारखेला १५ मिलिमीटर पाऊस झाला होता. गतवर्षी २५ जून रोजी येलदरी धरणात ४५५.०३९ एमएमक्यूब एवढा जिवंत पाणीसाठा होता.या धरणातून दररोज जिंतूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००७ एमएमक्यूब, परभणी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.०२८ एमएमक्यूब, सेनगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००२ एमएमक्यूब पाणी वापर आहे.

Yeldari Dam
Dam Water Stock : धरणांत आठ दिवसांत आठ टीएमसी पाणीसाठा

उपसा सिंचन योजनाद्वारे २.४५९ एमएमक्यूब वापर झाला. बाष्पीभवनाद्वारे ०.१४१ एमएमक्यूब व इतर व्यय ०.०२७ एमएमक्यूब आहे. येलदरी धरणाच्या खालच्या भागातील सिद्धेश्‍वर धरणाच्या कालव्याद्वारे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात आवर्तने सोडण्यात आली. पाणीसाठ्यात मोठी घट झाली.

मंगळवारी (ता. २५) या धरणात शून्य टक्का जिवंत पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२३) २५ जून रोजी या धरणात शून्य टक्का पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात १ जून २०२४ पासून आजवर ८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२३) याच तारखेला ५३ मिलिमीटर पाऊस झाला होता.

गेल्या २४ तासांत धरणात ०.३३५ एमएमक्यूब, तर यंदा १ जूनपासून ११.०७२ एमएमक्यूब पाण्याची आवक झाली आहे. १ जुलै २०२३ पासून या धरणाच्या कालव्याद्वारे २५०.०७४ एमएमक्यूब पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी ५.४१५ एमएमक्यूब पाणीसाठा आहे. उपसा सिंचनाद्वारे ५.४७० एमएमक्यूब पाणी वापर झाला. बाष्पीभवनाद्वारे ०.०९८ एमएमक्यूब व्यय होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com