Water Crisis : राज्यातील धरणांतील पाणीसाठा आला २७ टक्कांवर; टँकर सख्येतही झपाट्याने वाढ

Water Shortage : राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या सुर्य आग ओकत असून तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. याचा थेट फटका धरणातील पाणीसाठ्यावर झाला असून मोठ्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७ टक्क्यांवर आला आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम हा धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक धरणांची पाणीपातळी ३५ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. गुरूवारी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या जलाशयातील पाण्यासाठ्याच्या माहितीवरून यंदा राज्यातील १३८ मोठ्या धरणांमध्ये फक्त २७. १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच वाढणाऱ्या उष्णतेमुळे राज्याच्या विविध भगात टँकरच्या मागणीत देखील वाढ होत असून टँकरचा आकडा २८५० च्या पार गेला आहे. यामुळे राज्यात अशीच स्थिती राहिल्यास मे महिन्याच्या शेवटपर्यंत टँकरचा आकडा ३ हजारांपर्यंत पोहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 'एल निनो'मुळे पावसावर परिणाम झाला होता. यामुळे म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मात्र यंदा 'ला निना'मुळे भरपूर पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान वाढत्या तापमानामुळे मात्र धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.

Water Crisis
Pune Water Crisis : खडकवासला धरणात फक्त २९.९५ (दलघमी) पाणीसाठा शिल्लक; पाणीचोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू  

आता मे महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा २७. १३ टक्क्यांपर्यंत आला असून गेल्या वर्षी तो गेल्या वर्षी ३९. ३० टक्के होता. मात्र वाढलेल्या उन्हाच्या झळा आणि वाढेलेले तापमान यामुळे राज्यातील सर्व २९९४ धरणातील पाणीसाठा २८.८४ टक्क्यांवर आला असून तो मागील वर्षी ४१.१८ टक्के होता. यात सर्वाधिक धरणे ही छ.संभागी नगर विभागात असून येथे ९२० धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३५.६१ टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी येथे ४८.८१ टक्के पाणीसाठा होता. तो आता फक्त १३.२० टक्क्यांवर आला आहे.

छ.संभागी नगर विभागातील छ.संभागी नगर जिल्ह्यातील आपेगाव आणि पैठणच्या जायकवाडी धरणाची वाटचाल गतगाठण्याकडे सुरू आहे. सध्या आपेगाव धरणात २७.८६ टक्के पाणी असून हे छोटे आहे. तर १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या फक्त ८.४१ टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे सध्या छ.संभागी नगरमध्ये तीव्र पाणी टंचाई असून पाण्यासाठी लोकांना भटकावे लागत आहे.

टँकर सख्येतही झपाट्याने वाढ

राज्यात वाढणाऱ्या पाणीटंचाईमुळे अनेक जिल्ह्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यात सध्या २८५३ टँकर सुरू असून २२७७ गावे आणि ५६०५ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवले जात आहे. यात सर्वाधिक टँकर हे छ.संभागी नगर विभागात फिरवले जात असून येथे १४५५ टँकर लागत आहेत. छ.संभागी नगर विभागात छ.संभागी नगर, जालना, बीड पाठोपाठ परभणी आणि धाराशिव येथे सर्वाधिक टँकर लागत आहेत.

Water Crisis
Water Crisis : राज्यात जलसंकंट गडद; प्रमुख धरणांमध्ये राहिला फक्त ३१.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जिल्हा आणि टँकरची संख्या

छ.संभागी नगर - ५८६

जालना -४१९

बीड - ३१०

धाराशिव - १०६

नाशिक विभागात टँकरचा जोर

यापाठोपाठ नाशिक विभागात ६४७ टँकर सध्या पाणीवाटप करत आहेत. येथील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई भासत असून येथे क्रमश: २९४ आणि २६२ टँकरने लोकांची तहान भागवली जात आहे. यापाठोपाठ जडळगावमध्ये ८३ टँकर लागत आहेत.

पुणे विभागात पाणीटंचाई

यादरम्यान पुणे विभागात देखील पाणीटंचाई असून येथे लोकांच्या घशाला कोरड पडत आहे. डोक्यावर उन्हाच्या झळा सोसत महिलावर्गाला घागरीभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे विभागात सर्वाधिक टँकर सातारा जिल्ह्यात लागत आहेत. साताऱ्यानंतर पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात ५०३ गावे टँकरने २६९८ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com