Water Crisis : राज्यात जलसंकंट गडद; प्रमुख धरणांमध्ये राहिला फक्त ३१.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Water Stock : राज्यातील अनेक भागात सध्या तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. घागरीभर पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ आली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : गेल्या वर्षा कमी पडलेल्या पावसामुळे या वर्षी राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. अनेक धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने पीक करपले आहे. यादरम्यान राज्यातील सर्व २९९४ धरणातील पाणीसाठ्यात झापट्याने घट होत आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार गुरूवारी (ता. १८) राज्यातील सर्व २९९४ धरणातील पाणीसाठ्या गेल्या वर्षी पेक्षा ८.४१ टक्क्यांची घट झाली आहे. सध्या या सर्व धरणांमध्ये ३२.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर सर्वात कमी पाणीसाठा छ. सभाजी नगर विभागात असून येथे फक्त १५.८८ टक्केच पाणी शिल्लक आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी आणि चाराटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. अनेक धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होत असून राज्यातील प्रमुख १३८ मोठ्या धरणांमध्ये सध्या ३१.३९ टक्के पाणीासाठा राहिला आहे. मध्यम प्रकल्पांचा विचार केल्यास तो ३९.१७ टक्के आणि २५९६ लहू प्रकल्पांमध्ये आज ३०.७८ टक्के पाणी शिल्लक आहे.

Water Crisis
Water Crisis : राज्यातील धरणांत केवळ ३२.११ टक्केच पाणी; तीन दिवसात वाढले १८८ टँकर 

शून्य टक्के पाणीसाठा

अनेक धरणातील पाणी सध्या आटत असून पाणी तळ गाठत आहे. गोंदिया जिल्ह्यातील कालीसरार, बुलढाण्यातील खडकपूर्णा, बीडमधील माजलगावसह तीन धरणे, उस्मानाबादमधील सिना कोळेगाव, नाशिकमधील पुणेगाव, पुण्यातील लोणावळा टाटा आणि सोलापुरमधील भीमा उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर लातूर मधील सर्व ९ धरणांची वाटचाल शून्य टक्के पाणीसाठ्याकडे सध्या सुरू आहे.

Water Crisis
Water Crisis : पुण्यात जल संकट; जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी जपण्यासह सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्याचे आदेश

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने राज्यातील सहा विभागातील १,८३४ गावे आणि ४,४३४ वाड्यांवर २३२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक टँकर मराठवाड्यातील छ. संभाजीनगरमध्ये फिरत असून येथे ५२७ टँकर जिल्हाभर फिरत आहेत. छ. संभाजीनगरमधील ३४५ गावांसह ५१ वाड्यावस्त्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. याखालोखाल जालन्यात ३५८ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून बीडमध्ये १९९ टँकरने दररोज १६२ गावे आणि १२६ वाड्यांना पाणी पुरवणे सुरू आहे.

एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीबाणी दिसत असून नागरीक हैराण झाले आहेत. टँकरने पाणीपुरवठा वाढवावे अशी मागणी वाढत आहे. मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे इकडे दुर्लक्ष होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com