Pune Water Crisis : खडकवासला धरणात फक्त २९.९५ (दलघमी) पाणीसाठा शिल्लक; पाणीचोरी रोखण्यासाठी १४४ कलम लागू  

Khadakwasla Dam : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये कमालीची घट झाली आहे. सध्या खडकवासला धरणात उपयुक्त पाण्यासाठा फक्त २९.९५ दलघमी शिल्लक असल्याने जुलैपर्यंत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून नियोजन केले जात आहे.  
Khadakwasla Dam
Khadakwasla Dam PuneAgrowon
Published on
Updated on

Pune News : तीव्र उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे खडकवासला धरणातील पाण्यासाठ्यात कमालीची घट झाली आहे. येथे सध्या उपयुक्त पाण्यासाठा फक्त २९.९५ दलघमी शिल्लक आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद अलर्टमोडवर आले आहे. सध्या जिल्ह्यात पाण्याच्या योग्य नियोजनाकडे प्रशासनाचे लक्ष असून पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नवीन मुठा उजवा कालव्याच्या दोन्ही बाजुला ५० मीटरपर्यंत १४४ कलम लागू केले आहेत. 

पुण्यात ११६ टँकरने पाणी पुरवठा 

सध्या पुणे शहरासह राज्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलाशयांमध्ये कमालीची घट झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी टँकर फिरवले जात आहेत. पुण्यातही सध्या पाणीटंचाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असून प्रशासनाकडून जिल्ह्यात १३० गावे आणि ८०४ वाड्यांना ११६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने आणि आचारसंहिता असल्याने पुढाऱ्यांना यात लक्ष घालता येत नाही. तर प्रशासन निवडणुकींच्या कामात दंग आहेत. 

Khadakwasla Dam
Pune Water Shortage : पुणेकरांच्या चिंतेत भर!; घटणारा पाणीसाठा अन् नीरा धरणाच्या उजव्या कालव्याला गळती

५० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश 

खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात घट होत आहे. यामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणीचोरी रोखणे गरजेचे आहे. यासाठी नवीन मुठा उजवा कालव्यावर उपाय योजना आखाव्यात अशी मागणी जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच खडकवासला ते इंदापूरपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजुला ५० मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करावा अशीही मागणी जलसंपदा विभागाने केली होती. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. 

Khadakwasla Dam
Pune Water Scarcity : पुणे विभागात पाणीटंचाई कायम

जलसंपद विभागाच्या अधिकाऱ्यांची विनंती

खडकवासला धरण साखळीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा सुमारे तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा कमी आहे. यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणांमधील उपलब्ध पाण्याचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत. तसेच नवीन मुठा उजवा कालव्यातून बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी जलसंपद विभागाच्या खडकवाला प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता (प्रभारी) सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती केली होती. 

१३० गावांना पाण्याची समस्या

खडकवासला धरणात आज उपयुक्त पाण्यासाठा हा ५९.९५ दलघमी असून शिल्लक उपयुक्त पाण्यासाठा फक्त २९.९५ दलघमी आहे. सध्या धरणात ५३.५७ टक्के पाणी साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ५३.९८ टक्के होता. तर द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील एकूण १३० गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. सध्या जिल्ह्यातील २.२६ लाख लोकसंख्येला १६६ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com