Water Crisis : जलसंकटाचे सावट! नागपूरसह पालघरचे पाडे, गडचिरोलीचा अतिदुर्गम भाग आणि धुळ्यात भीषण पाणी टंचाई

Water Crisis At Palghar, Gadchiroli and Dhule : राज्यातील अनेक भागांत पाणी टंचाईचं सावट गडद झाले आहे. वाढत्या उन्हाने जलाशयांतील पाणीसाठा घटला असून नागरिकांना रणरणत्या उन्हासह पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्यात काही दिवसापासून वळवाच्या पावसाने हजेरी लावत शेतीचे नुकसान केले आहे. तसेच काही जिल्ह्यात उन्हाचा जोर वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे येथील जलस्त्रोत आटत चालले असून नागरिकांना रणरणत्या उन्हासह पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यादरम्यान नागपूरसह पालघर, गडचिरोली आणि धुळ्यात भीषण पाणी टंचाईला नागरीकांचा तोंड द्यावे लागत आहे.

नागपूरचा पारा वाढला

नागपूर जिल्ह्यात तापमानाने ४२ अंश सेल्सिअचा पार केला असून येथे भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात विहीर आणि बोअरवेलने तळ गाठले आहे. येथील ११ गावांतील ३२ हजार २३२ लोकसंख्या सध्या ७ टँकर्सच्या पाणीपुरवठ्याने तहान भागवत आहे.

गेल्या काही दिवसापांसून येथे होणाऱ्या अवकाळी आणि मान्सून पूर्व पावसामुळे हिंगणा तालुका सोडला तर इतर तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या नाही. मात्र आता हिंगणा तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढताना दिसत आहे. तालुक्यातील वडधामना, सुकळी कलार, डेगमा खुर्द, नवेगाव, धानाली कवडस, इसासनी, नागलवाडी, खापा निपाणी या गावांमध्ये पाणी टंचाई आहे.

Water Crisis
Solapur Water Crisis : सोलापुरात पाणी टंचाई तीव्र; हतबल झालेल्या शेतकऱ्यांने चालवली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

यावरून जिल्हाप्रशासनाकडून माहिती घतली असता पियुष चिवंडे उपजिल्हाधिकारी, महसूल यांच्याकडू सध्या जिल्ह्यातील हिंगणा तालुका सोडला तर इतर तालुक्यात पाणी टंचाई नाही. हिंगणा तालुक्यातील पाणीटंचाईसह चारा टंचाईवरून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडून पशूसंवर्धन विभागासह आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाची बैठक झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना अहवालानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात इतर ठिकाणी पाणी टंचाई नसून जेथे पाणी टंचाई भासत आहे. तेथे कार्यकारी अभियंत्यांसह पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले जात आहेत. सध्या चारा मुबलक उपलब्ध असून चाराटंचाई नाही. तर पाणीटंचाई बाबत जसे अहवाल प्राप्त होतील मागणी होईल त्याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

- जिल्हाप्रशासन

पालघरमध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा

पालघर जिल्ह्याला देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून येथील अनेक धरणं, जलाशयांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या ८ धरणांनी तळ गाठला असून येथे २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात ३१ गावे आणि १२२ पाड्यांवर भीषण पाणीटंचाई जाणवत असून ६०,४३६ नागरिकांसह १८ हजाराहून अधिक पशूधनाची तहान भागवली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पाणी टंचाई

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असणाऱ्या झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत विविध वाड्या वस्त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. येथे २ हजार ८६१ नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून नदी उशाला असूनही घशाला कोरड अशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. गावापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणारी इंद्रावती नदी असूनही येथे पाण्याची व्यवस्था नाही. यंदा परिसरात भीषण पाणीटंचाई असून विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेल देखील आटले आहेत. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.

Water Crisis
Water shortage Crisis : राज्याच्या अनेक भागात पाणीबाणी; धरणे आटली, मराठवाड्यासह प.विदर्भात परिस्थिती गंभीर

धुळेकरांवर 'पाणी'संकट

दरम्यान धुळ्यासह राज्यातील काही जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मोरशेवडी, जुन्नर भागांत विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तर पाण्याच्या एका ड्रमसाठी नागरिकांना ६० रुपये मोजावे लागत आहेत. दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणण्याची वेळ महिलांवर आली आहे.

ग्रामस्थांची मागणी

ही वेळ जिल्हा प्रशासनाच्या नियोजना अभावी झाली असून विहिरी अधिग्रहित करण्यासह कोणत्याही उपाययोजना प्रशासनाने केलेल्या नाहीत असा आरोप ग्रामीण भागातील नागरीक करत आहेत. मात्र याबाबत ग्रामस्थाकडून पाण्याची कोणतीच मागणी करण्यात आलेली नाही असा प्रशासनाचा सुर आहे. तर मागणी येताच ती पूर्ण केली जाईल असेही प्रशासनाने म्हटले आहे. तसेच पावसाळा सुरू होण्यास अद्याप वेळ लागणार असून प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अधिकारी आणि कर्मचारी मतमोजनीच्या कामात

धुळ्यातील पाणी टंचाईच्या उपाय योजनांमध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुक आड आली आहे. राज्यात पार पडलेल्या निवडणुकांची मतमोजनी ४ जूनला होणार असून सध्या याची तयारी केली जात आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकतर अधिकारी आणि कर्मचारी हे या कामात आहेत. यामुळे धुळ्यातील पाणी टंचाई बाबात सध्या कोणतीच ठोस उपाय योजना होताना दिसत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com