
Parbhani News : तापमानातील वाढ तसेच बेसुमार उपश्यामुळे परभणी जिल्ह्यातील लघु तसेच मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट सुरु आहे. मागील तीन आठवड्यामध्ये लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात १० टक्के तर मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये ११ टक्के घट झाली आहे.
गुरुवारी (ता. २०) दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २१.५८८ दलघमीनुसार ४१ टक्के तर २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ९.२३२ दलघमीनुसार २२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जोगवाडा, चिंचोली, आडगाव, केहाळ (ता. जिंतूर) ,आंबेगाव (ता. मानवत) या ५ लघू तलावातील जलसाठा जोत्याखाली गेला आहे. या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या लोकवस्त्यांवर पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. गुरुवारी (ता.२०) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ९.२३२ दलघमीनुसार २२ टक्के जलसाठा होता.
देवगाव लघु प्रकल्पामध्ये २ टक्के, बेलखेडा लघु प्रकल्पामध्ये १ टक्का, वडाळी लघु प्रकल्पामध्ये ४१ टक्के, चारठाणा लघु प्रकल्पामध्ये ३ टक्के, भोसी लघु प्रकल्पामध्ये २७ टक्के, कवड लघु प्रकल्पामध्ये १५ टक्के, मांडवी लघु प्रकल्पामध्ये १२ टक्के, दहेगाव लघु प्रकल्पामध्ये २७ टक्के,पाडाळी (जि.जालना) लघु प्रकल्पामध्ये ३१टक्के पाणीसाठा होता.
पेडगाव (ता. परभणी) लघु प्रकल्पामध्ये १८ टक्के, झरी लघु तलावामध्ये ९२ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) लघु प्रकल्पांमध्ये १४ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) लघु प्रकल्पांमध्ये २० टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) लघु प्रकल्पामध्ये ३९ टक्के, टाकळगाव लघु प्रकल्पांमध्ये ४ टक्के, कोद्री (ता. गंगाखेड) लघु प्रकल्पामध्ये ६ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) लघु प्रकल्पांमध्ये ५८ टक्के जलसाठा आहे. २०२४ मध्ये २० मार्च रोजी लघु लघु प्रकल्पांमध्ये सरासरी २.६५१ दलघमी (६ टक्के) जलसाठा होता. सात लघु प्रकल्प कोरडे पडले होते तर ७ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता.
मध्यम प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा...
करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. २०) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात ८.६२६ दलघमी म्हणजेच ३५ टक्के तर मासोळी धरणामध्ये १२.९६२ दलघमी म्हणजेच ४८ टक्के उपयुक्त जलसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २१.५९८ दलघमीनुसार ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षी २०२४ मध्ये २९ मार्च रोजी करपरा मध्यम प्रकल्पांत १.२५५ दलघमी (५ टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.