Solapur News : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांना उजनीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने टेंभूचे पाणी माण नदीत सोडून नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आवताडे यांनी दिलेले आश्वासन सार्थकी लागले असून, टेंभू योजनेचे पाणी पहिल्यांदाच मंगळवेढ्यात आल्याने नदीकाठचा शेतकरी सुखावला आहे.
आमदार आवताडे यांनी माण नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी नुकताच गावभेट दौरा केला होता. त्यावेही ममदाबाद (शे.) येथे उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे माण नदीपात्रात पाणी सोडणे अडचणीचे ठरणार आहे, म्हणून टेंभूचे पाणी सहजरीत्या माण नदीपात्रात येऊ शकते.
यासाठी टेंभूचे पाणी सोडण्याची मागणी केली असता आमदार आवताडेंनी तत्काळ त्यासंदर्भात टेंभूच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात मागणी केली असता, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ टेंभू योजनेचे सचिव दीपक कपूर यांना सूचना दिल्या.
माण नदीकाठच्या तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ, लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगाव, शरदनगर या गावांना याचा लाभ होणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये जवळपास ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परतीच्या पावसात त्यामध्ये आणखी किती पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो, याविषयी आताच अंदाज बांधणे शक्य नाही. आमदार आवताडेंच्या प्रयत्नाने बुधवारी (ता. ११) मारापूर येथील बंधाऱ्यात पाणी पहिल्यांदाच आल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.