Tembhu canal burst : टेंभू योजनेचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया

Agriculture Irrigation : पाण्याच्या उच्च दाबामुळे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाचेगाव येथे कालवा फुटल्याचे सांगण्यात आले.
tembhu canal
tembhu canalarowon
Published on
Updated on

कोळा, जि. सोलापूर - सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रूक येथे टेंभू योजनेचा पाचेगाव, किडेबिसरी मार्गे कवटेमहांकळकडे जाणारा कालवा रविवारी (ता.८) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

tembhu canal
Tembhu Irrigation Project : ‘टेंभू’ला रिक्त पदांचे ग्रहण

टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून माण खोऱ्यातील कडेगाव, खानापूर, सांगोला, आटपाडी कवठेमंकाळ या दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरणारी ही योजना आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाचेगाव बुद्रूक मार्गे किडेबिसरी, नागज व आसपासच्या परिसरात पाण्याचे आवर्तन सध्या सुरु आहे.

tembhu canal
Tembhu Water Scheme : टेंभू योजनेवरून सांगलीचे आमदार -खासदार आमने -सामने, आबांच्या घरावर काकांचा प्रहार

टेंभू उपसा सिंचन योजनेचा तीन क्रमांकाचा पंप सुरु केल्यामुळे पाण्याच्या उच्च दाबामुळे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाचेगाव येथे कालवा फुटल्याचे सांगण्यात आले. या पाण्यामुळे परिसरातील शेतात पाणी घुसल्याने ज्वारी, बाजरी, मका, डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनेबाबत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती. पण शेतकऱ्यांनी थेट दूरध्वनी करुन सांगितल्यानंतर अधिकारी आले. पण पाण्याच्या प्रवाहापुढे कोणीच काही करू शकले नाही.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com