Tembhu Irrigation Scheme : सावळजसह आठ गावांचा ‘टेंभू’त समावेशासाठी उपोषण

Irrigation Scheme : तासगाव-कवठेमहांकाळ हा कायम दुष्काळाचा कलंक असलेल्या मतदार संघातील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी व डोंगरसोनी ही आठ गावे या योजनेच्या पाण्यापासून अनेक वर्षे वंचित आहेत.
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme
Published on
Updated on

Sangli News : सावळज व परिसरातील आठ गावे अनेक वर्षांपासून टेंभू योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभूच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या गावांचा योजनेत समावेश व्हावा, यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा आमदार सुमन पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला. यात आठ गावांतील शेतकरीही सहभागी होणार आहेत. तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले.

टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme
Tembhu Irrigation Project : ‘टेंभू’ला रिक्त पदांचे ग्रहण

तासगाव-कवठेमहांकाळ हा कायम दुष्काळाचा कलंक असलेल्या मतदार संघातील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी व डोंगरसोनी ही आठ गावे या योजनेच्या पाण्यापासून अनेक वर्षे वंचित आहेत.

टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme
Tembhu Water Project Farmer : टेंभूच्या पाण्यासाठी पैसे भरूनही अधिकाऱ्यांनी पाणी दिलं नाही, शेतकऱ्यांना संताप अनावर

दिवंगत आर. आर. पाटील यांनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, गिरीश महाजन, जयंत पाटील यांची पाच वेळा भेट घेऊन व निवेदने देऊन गावांच्या टेंभूत समावेशाची मागणी केली. राज्य शासनाने अतिरिक्त ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर टेंभूचा नवा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र अद्याप मान्यता मिळाली नाही.

‘आदेश आल्याशिवाय माघार नाही’

उपोषणात आठ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जोपर्यंत टेंभूच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार नाही, तसे आदेश शासन पारित करणार नाही तोवर बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार आहे. आपल्या स्तरावरून राज्य सरकारला जाणीव करून द्या, असे या निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com