Water Management : जल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करताना शेतकऱ्यांशी संवाद

Water Conservation : या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत.
Water Management
Water Management Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून शेतकऱ्यांशी संवाद साधा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या.

जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यांनतर जिल्हाधिकारी यांनी याबाबत नियोजन बैठक घेतली.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे संजय पाटील, रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

Water Management
Water Conservation : जलसाक्षरता वाढविण्यासाठी ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा होणार

पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे. जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.

Water Management
Water Conservation : ‘जलतारा’मुळे दोन पावसाच्या हंगामातच पाणीपातळी वाढते

या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येनुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

‘पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापराला प्राधान्य’

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com