Water Conservation : जलसाक्षरता वाढविण्यासाठी ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा होणार

Water Management Awareness : यामध्ये १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’मध्ये १५ एप्रिल २०२५ रोजी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ होणार आहे.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Jalna News : नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढविणे, जल व्यवस्थापनाच्या शाश्‍वत उपाययोजना राबवणे तसेच जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा आणि विविध योजनांची माहिती नागरिकांना प्राप्त होऊन त्यांना लाभ घेता यावा. याकरिता जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल, २०२५ या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.

यामध्ये १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’मध्ये १५ एप्रिल २०२५ रोजी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ होणार आहे. १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, १८ एप्रिल रोजी शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी,

Water Conservation
Water Conservation Project : पाणी शेतातच मुरवणारा ‘जलतारा’

२० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, २१ एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे, २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन बाबत बैठक / कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, २४ एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणीदर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकित पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, २५ एप्रिल रोजी विद्यापीठ / केव्हीके/ सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम,

Water Conservation
Water Conservation : ‘जलतारा’मुळे दोन पावसाच्या हंगामातच पाणीपातळी वाढते

२६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण), २८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे / अतिक्रमण निष्कासन दिनांक ३१ मे पूर्वी करणे,

२९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र / कार्यशाळा आणि ३० एप्रिल, २०२५ रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंतांचा सत्कार व पंधरवडा समारोप असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे, जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com