Water Crisis : मोरेवाडी, धनगरवाड्यावर पाण्यासाठी वणवण

Water Issue : उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असून आजरा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात वाटंगीपैकी मोरेवाडी व धनगरवाडा या वसाहतींना पाणीटंचाई भासू लागली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Kolhapur News : उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असून आजरा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात वाटंगीपैकी मोरेवाडी व धनगरवाडा या वसाहतींना पाणीटंचाई भासू लागली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पंचायत समिती प्रशासनाने टंचाई दूर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी कूपनलिका अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Water Crisis
Water Crisis : रायगडमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र

तालुक्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील वाटंगीपैकी मोरेवाडी व मोरेवाडी धनगरवाडा या वसाहतीवर पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना धावपळ करावी लागत आहे. शेतवडी, शिवारातील विहिरींवर पिण्याच्या पाण्यासाठी महिला व पुरुषांच्या रांगा लागत आहेत.

वाटंगीपासून तीन किमीवर मोरेवाडी व धनगर वसाहत आहे. येथील लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. या वसाहतींना जंगलातून सायफन पद्धतीने पाणीपुरवठा होतो. यंदा पाऊस कमी झाल्याने जंगलातील झरे आटले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळवणे अडचणीचे झाले असून पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

Water Crisis
Water Shortage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा १८ टक्क्यांवर

येथील पंचायत समितीमध्ये मोरेवाडी, मोरेवाडी धनगरवाड्यावरील पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकारी संजय ढमाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली असून येथील खासगी कूपनलिका अधिग्रहणाचा निर्णय घेतला आहे. मोरेवाडी व मोरेवाडी धनगर वसाहतीवरील दोन कूपनलिका अधिग्रहण करून त्यातील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरवले जाणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता महादेव तिवले यांनी सांगितले.

पाऊस कमी झाल्याने जंगलातील झरे आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कूपनलिकांचे अधिग्रहण केले तरी मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होणार आहे. याबाबत ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे.
जुजेवास नोरोना, ग्रामस्थ, मोरेवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com