Water Resources : नांदेडला खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण

Water Scarcity : सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. तशी टचांईची तीव्रताही वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन उपाय-योजना सुरू केल्या आहेत.
Drought
Drought Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. तशी टचांईची तीव्रताही वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन उपाय-योजना सुरू केल्या आहेत.

याअनुशंगाने पाणी टंचाई जाणवणाऱ्या २५ गावात ३१ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिगृहण करुन नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून मिळाली.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नागरी भागासह ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. टंचाई निवारणार्थ शासन वेगळ्या स्वरूपाचे उपाययोजना आखून नागरिकांसह जनावरांना पाणी उपलब्ध करून देते.

Drought
Drought Crisis : शेतकऱ्याकडून ३०० जनावरांसाठी पाण्याची सुविधा

यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे, पूरक नळ योजना घेणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगती पदावरील उपाय योजना पूर्ण करणे आदी उपाय योजना राबविल्या जातात.

या कृती आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन दिला जातो. यंदाही जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ उपाय योजना लागू केल्या आहेत. यानुसार टंचाई जाणवणाऱ्या २५ गावात ३१ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिगृहण करण्यात आले आहे.

Drought
Drought Crisis : दुष्काळाच्या दाहकतेने अंजीर बागा धोक्यात

यात भोकर तालुक्यातील पाच गावात पाच ठिकाणी, नायगाव तालुक्यात चार गावात १० ठिकाणी, लोहा तालुक्यातील १३ गावात १३ ठिकाणी तर किनवट तालुक्यातील तीन गावात तीन ठिकाणी खासगी विहीरींचे अधिगृहण करुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान मार्च महिना संपल्यानंतर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.

तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहोचल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. अनेक विहिरीतील पाणी अटले आहेत. नदी-नालेही कोरडे पडल्याने जनावरांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.

किनवट व माहून जंगलातील प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात वस्त्यांवर येत असल्याने वन विभागाकडून कृत्रीम पाणवठे तयार करुन त्यांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढली तर नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com