Jalgaon Water Storage : जळगाव जिल्ह्यात केवळ ३१ टक्के उपयुक्त जलसाठा

Water Crisis : गिरणा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पाहता या चार-पाच तालुक्यांसह अन्य पाणीपुरवठा योजनांना मॉन्सून सुरू होऊन किमान महिनाभर तरी पाणीपुरवठ्यासाठी कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Water Shortage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठा आता केवळ ३१ टक्के उरला आहे. दमदार पाऊस होऊनदेखील सिंचन प्रकल्पांत जलसाठा होण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी आहे. तोपर्यंत नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर असे तीन मोठे, तर १४ मध्यम व ९६ लघुप्रकल्प आहेत. यात वाघूर ७०.२२, हतनूर ३२.०८, तर गिरणा प्रकल्पात अवघा २१ टक्के असा उपयुक्त जलसाठा आहे. गिरणा प्रकल्पावर चार ते पाच तालुक्यांसह दीडशेवर ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्पातून पेयजलाची तीन आवर्तने शिल्लक आहेत.

Water Shortage
Water Crisis : पंधरा दिवसांआड मिळते २० मिनिटे पाणी

गिरणा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पाहता या चार-पाच तालुक्यांसह अन्य पाणीपुरवठा योजनांना मॉन्सून सुरू होऊन किमान महिनाभर तरी पाणीपुरवठ्यासाठी कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Water Shortage
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ३७० गावे, १४९ वाड्यांना टंचाईच्या झळा

जिल्ह्यात गेेल्या मॉन्सूनदरम्यान सरासरीच्या दीडपट धो-धो बरसात झाली होती. त्यामुळे गिरणा, हतनूरसह वाघूर व अन्य लघुमध्यम प्रकल्प भरभरून ओसंडले होते. दरम्यान, पाणी कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरणा प्रकल्पातून सिंचनाचे तीन व पेयजलाचे चार अशा सात आवर्तनानुसार पाणीसाठा आरक्षण लागू करण्यात आले होते.

नागरिक व पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसार डिसेंबरपासूनच सिंचनासाठी अखंडपणे फेब्रुवारी अखेरपर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली होती. या आवर्तनातून तब्बल ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्याच्या आवर्तनातून वापर झाला आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठा (टक्केवारीमध्ये) असा

हतनूर ३१.०८

गिरणा २१.०५

वाघूर ७०

मन्याड ११.५१

सुकी ७२.६८

अभोरा ६४.५८

तोंडापूर १३.४८

मंगरूळ ४१.५६

बहुळा २५.८६

मोर ६४.७५

अंजनी २८.५९

गूळ ४४.९६

शेळगाव बॅरेज २२.६६

बोरी ००

भोकरबारी ००

अग्नावती २.३९

हिवरा ७

जिल्ह्यातील प्रकल्पांत ३१ टक्के अर्थात १६ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सरासरी २७.०३ टक्केनुसार १४.६८ टीएमसी जलसाठा शिल्लक असल्याची नोंद आहे. यावर्षी १५ गावांसाठी १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. म्हणून जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com