Water Crisis : पंधरा दिवसांआड मिळते २० मिनिटे पाणी

Water Scarcity : नळाला पंधरा दिवसांआड, तर कधी वीस दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने तांदळवाडी (ता. वाशी) येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Washi News : नळाला पंधरा दिवसांआड, तर कधी वीस दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने तांदळवाडी (ता. वाशी) येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव अन् लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे तांदळवाडीकरांना उन्हाळ्यात दरवर्षी घागरभर पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती करावी लागते.

गावपुढारी, लोकप्रतिनिधींना गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अद्याप तरी यश आले नसल्याने गावात नळाला कधी पंधरा दिवसांआड, तर कधी वीस दिवसांआड पाणी मिळते. तेही अवघे पंधरा ते वीस मिनिटे! त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

तांदळवाडी गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. मागील काही वर्षांपासून पिंपळवाडी (ता. वाशी) परिसरात असलेल्या इराचीवाडी साठवण तलावावरून गावात सार्वजनिक नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो.

पावसाळा व हिवाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होत असला तरी उन्हाळ्यात मात्र दरवर्षी ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येते. साठवण तलावात मुबलक पाणीसाठा असूनही केवळ नियोजनाअभावी पाणी मिळत नाही. ग्रामस्थांमधून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी वेळोवेळी केली जात असली तरी ही समस्या अद्याप सुटलेली नाही.

Water Scarcity
Nanded Water Crisis : नांदेडमध्ये मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

यावर्षी तापमानात मोठी वाढ झाल्याने साहजिकच घरात होणारा पाण्याचा वापर वाढलेला आहे. मात्र, नळाला पंधरा-पंधरा दिवस पाणीच येत नसल्याने तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना तळ गाठलेल्या आडावरून जीव धोक्यात घालून पाणी शेंदण्याची वेळ येत आहे. शाळकरी विद्यार्थीही पाणी शेंदताना दिसून येतात.

गावात काहींच्या घरात बोअरवेल असून, आर्थिक परिस्थितीने सधन असलेले काही नागरिक सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी येथून हजार लिटर पाण्यासाठी तब्बल पाचशे रुपये खर्च करून विकतच्या पाण्यावर तहान भागवीत आहेत. गावात प्रामुख्याने सामान्य कुटुंबांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत असून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Water Scarcity
Water Crisis : अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाई

ग्रामस्थ काय म्हणतात...

गोकुळ उंदरे म्हणाले, की गावात पंधरा ते वीस दिवसांआड तेही अवघे पंधरा ते वीस मिनिटे नळाचे पाणी मिळते. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकतच नसल्याने पाण्याची समस्या कोणाकडे मांडावी, हा प्रश्न आहे. गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होते.

गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गावात पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी गुत्तेदार वापरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून घागरभर पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागते. काही जण हजार लिटरसाठी ५०० रुपये खर्चून पाणी विकत घेऊन पाण्याची गरज भागवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com