Manikrao Kokate
Manikrao KokateAgrowon

Agriculture Ministry: शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते: कोकाटे

Manikrao Kokate: ‘‘ माझ्या कार्यकाळात कृषी खात्यात नवनवीन बदल करण्याचा प्रयत्न केला. राज्यभर फिरून समस्या जाणून घेतल्या. त्यावर अधिक काम करायचे होते, मात्र खाते काढून घेतले. मी यावर नाराज नाही. मी खूष असून, दत्तात्रय भरणे यांना गरज पडल्यास सल्ला देईन.’’
Published on

Mumbai News: ‘‘ माझ्या कार्यकाळात कृषी खात्यात नवनवीन बदल करण्याचा प्रयत्न केला. राज्यभर फिरून समस्या जाणून घेतल्या. त्यावर अधिक काम करायचे होते, मात्र खाते काढून घेतले. मी यावर नाराज नाही. मी खूष असून, दत्तात्रय भरणे यांना गरज पडल्यास सल्ला देईन,’’ अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‘‘शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकरीकेंद्रित कारभार करण्यावर माझा भर असेल. मंगळवारी कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहे,’’ अशी माहिती मंत्री दत्ता भरणे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खातेबदलावर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करूनच खातेबदल केले आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटेंची अजित पवारांकडून खरडपट्टी; कृषिमंत्र्यांनी मागितली माफी

नंदूरबार दौऱ्यावर निघालेले क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘दत्ता भरणे यांना गरज पडल्यास दत्तात्रय भरणे यांची मदत घेईन. आणि त्यांना गरज पडली तर कृषी विभागासंबंधी सल्ला देईन. कृषी विभागात अल्पकाळात खूप काही करता आले. पारदर्शी पद्धतीने बदल्या करण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विभागवार मेळावे आयोजित करून त्यांच्या प्रश्नांची वर्गवारी केली.

या वर्गवारीतून निर्णय घेतले. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा असावी, यासाठी शेतकरी जनता दरबार सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी पातळीवर ही प्रक्रिया करण्याचा मानस होता. शेतकऱ्यांसंबंधी मी नेहमीच संवेदनशील राहिलो आहे.’’

Manikrao Kokate
Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

प्रामाणिकपणे प्रयत्न करेन: भरणे

नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, की कृषी विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यावर माझा भर असेल. या जबाबदारीतून, मला शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे प्राथमिक ध्येय असेल. शेतकऱ्यांचा आवाज सरकारच्या प्रत्येक धोरणापर्यंत पोहोचावा यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. शेतकऱ्यांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण कृषी उपक्रम कसे राबवले जातील यावर ते लक्ष केंद्रित करेन.

‘इंदापूरची बारामती करेन ’

मंत्री भरणे म्हणाले, ‘‘मी एका शेतकरी कुटुंबातील आहे आणि अजित पवार यांनी मला खूप काही दिले आहे. पवार कुटुंबाने नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केले आहे. आता मी इंदापूरदेखील बारामतीसारखे करण्याचा प्रयत्न करेन.’’

खात्यांतील बदल चर्चेअंतीच : मुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडील खात्यांतील बदलाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते बदलाचा निर्णय चर्चेअंतीच घेतला आहे. मी सर्व मंत्र्यांना याआधीही सूचना दिली आहे. सर्वांना ही शेवटची संधी आहे. यापुढे चूक झाल्यास माफी दिली जाणार नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com