Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान? कुठे होणार काटे की टक्कर

Election Commissioner : लोकसभेच्या ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024agrowon
Published on
Updated on

Maharashtra Lok Sabha Election :भारतात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. याचबरोबर ४ राज्यातील निवडणुकांचाही बिगुल वाजला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी घोषणा केली. यामध्ये १९ एप्रिल ते १ जून पर्यंत मतदान होणार आहे. तर निकाल ४ जूनला लागेल, अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर, हातकणंगले आणि बारामती मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या तीन मतदार संघात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर मतदार संघात शाहू छत्रपती यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर शाहू महाराज यांच्याविरोधात अद्याप महायुतीकडून उमेदवार ठरलेला नाही. विद्यमान खासदार संजय मंडलीक यांचा पत्ता कट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा मतदार संघ असलेल्या हातकणंगलेमधून माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे अशी भूमिका अद्याप घेतलेली आहे. तर यांचे प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत अद्याप टांगती तलवार आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Elections : देशात लोकसभा निवडणूकांचा धुरळा ७ टप्प्यात, ४ जूनला निकाल

राज्यातील तिसरा हायव्होलटेज ड्रामा बारामती मतदार संघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत होईल असे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील या मतदार संघात अत्यंत चुरशीची ७ मे रोजी मतदान होणार आहे.

कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर आणि माढा, बारामती या लोकसभा मतदारसंघात सात मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिल, सात मे, तेरा मे, वीस मे आणि २५ मे २०२४ रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील अशा असतील तारखा

पहिला टप्पा - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर (मतदान तारीख – 19 एप्रिल )

दुसरा टप्पा - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी (मतदान तारीख – 26 एप्रिल)

तिसरा टप्पा - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले (मतदान तारीख – 7 मे )

चौथा टप्पा - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (मतदान तारीख – 13 मे )

पाचवा टप्पा - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (मतदान तारीख – 20 मे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com