Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी १० हजार मतदान केंद्रे

2024 India Election Update : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत १० हजार ६५२ मतदान केंद्रांवर ९५ लाख ५४ हजार ६६७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी (ता. १९) मतदान होत असून महाराष्ट्रातील पाच मतदार संघांचा यात समावेश आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत १० हजार ६५२ मतदान केंद्रांवर ९५ लाख ५४ हजार ६६७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील,’’ अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगन यांनी मंगळवारी (ता. १६) दिली.

चोक्कलिंगन म्हणाले, ‘‘गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मात्र तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. १२४ सशस्त्र दले पाचही लोकसभा मतदार संघांत तैनात केली आहेत.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : संकल्पपत्र विरुद्ध न्यायपत्र

तसेच परराज्यांतील काही तुकड्याही मागविल्या आहेत. पाच लोकसभा मतदार संघांत ९७ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ होईल. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रात उपस्थित असतील त्यांना मतदान करता येईल.’’

‘‘गडचिरोली मतदार संघातील आमगाव, आरमोरी, गडरिोली, अहेरी हे चार तर भंडारा- गोंदिया मतदार संघातील अर्जुने मोरगाव अशा पाच विधानसभा मतदार संघांत दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. निवडणुकीच्या आधी ४८ तास प्रचार संपेल. या काळात स्टार प्रचारक आणि पक्षांचे मतदारसंघाबाहेरील नेते ये-जा करू शकतात, मात्र, त्यांना तेथे वास्तव्य करता येणार नाही,’’ असेही चोक्कलिंगम म्हणाले.

Loksabha Election
Election 2024 : रखरखत्या उन्हात कोल्हापुरच्या गादीसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

१६ हजारांवर शस्त्रे जमा करण्यातून सूट

‘‘राज्यात ७८ हजार १४५ शस्त्र परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी ४३ हजार ८९३ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर १६ हजार १८२ शस्त्रे जमा करण्यापासून सूट दिली आहे. आतापर्यंत १९८ शस्त्रे जप्त केली आहेत. ७० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आतापर्यंत ४२१ कोटी ४१ लाख रुपयांचे मद्य, ड्रग्ज, मौल्यवान धातू, फिब्रीज आणि रोख रक्कम जप्त केली आहे,’’ असे चोक्कलिंगन म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात आठ, तर तिसऱ्यात ११ मतदार संघ

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी हे तर तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील २, पश्चिम महाराष्ट्रातील ७, कोकणातील २ अशा ११ लोकसभा मतदार संघांत मतदान होईल. १९ एप्रिलपर्यंत येथे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदार संघांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com