Loksabha Election 2024 : सव्वासात लाख तरुण ठरवणार लोकसभा उमेदवारांचे भविष्य

Nagar Loksabha Update : नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा १८ ते ३० वयोगटातील सुमारे सव्वा ७ लाख मतदार आहेत. त्यामुळे तरुण मतदारांच्या मतावरच लोकसभा निवडणुकीत विजयाची भिस्त असणार आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघात यंदा १८ ते ३० वयोगटातील सुमारे सव्वा ७ लाख मतदार आहेत. त्यामुळे तरुण मतदारांच्या मतावरच लोकसभा निवडणुकीत विजयाची भिस्त असणार आहे. शेतीचे प्रश्न, मराठा आरक्षण, बेरोजगारी हे प्रश्न या निवडणुकीत अजेंड्यावर असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात लोकसभेसाठी ३६ लाख ३५ हजार ३६६ मतदार आहेत. त्यात यंदा नव्याने ४६ हजार ५३९ नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात ३० वर्षांच्या आतील ६ लाख ९२ हजार ५६० मतदार आहेत. दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात नगर शहरासह शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड, नगर-पारनेर, श्रीगोंदा व राहुरी हे विधानसभा मतदार संघ तर शिर्डी लोकसभा मतदार संघात शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, नेवासा हे विधानसभा मतदार संघ आहेत.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : संकल्पपत्र विरुद्ध न्यायपत्र

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात तिशीच्या आतील ३ लाख ८४ हजार ६४३ मतदार आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात ३ लाख ५४ हजार ६४६ मतदार आहेत. जुनी-जाणती मंडळी वैयक्तिक राजकीय संबंधांवर मतदान करतात. मात्र बहुतांश नव तरुण सध्याची राजकीय, सामाजिक स्थितीवर मतदान करत असल्याचा अलीकडच्या काही निवडणुकांतील अनुभव आहे.

मागील काही वर्षांत शेतीची अवस्था वाईट झाली आहे. शेतमालाला दर नाही, रोजगार, मराठा आरक्षण, दूध दर आणि इतर सामाजिक विषय चर्चेत आहेत. यावर आधारीत हे नव तरुण मतदान देतील. गाव पातळीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांना नव तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे दिसत आहे.

Loksabha Election
Loksabha Election : शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष लोकसभेत अलिप्त राहणार

बेरोजगारी, मराठा आरक्षण अजेंड्यावर

लोकसभा निवडणुकीत नेत्यांना लोकांसमोर जाताना अनेक प्रमुख प्रश्नाला तोड द्यावे लागत आहे. त्यातही तरुण मतदारांत प्रामुख्याने मराठा आरक्षण, बेरोजगारी तसेच बहुतांश तरुण मतदार शेतकरी कुटंबातील असल्याने शेतमाल, दूध दराचा प्रश्न यासारख्या बाबी अजेंड्यावर येत आहेत. काही गावांत तर हे तरुण मतदार थेट उमदेवारांनाच या बाबीचे काय झाले, तुमचे प्रश्न काय? असे प्रश्न विचार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांनी प्रचार सुरू केला, पण दुष्काळावर न बोलता एकमेकांची उणी-दुणी काढण्यावर भर देत आहेत.

विधानसभा मतदार संघ निहाय तीस वर्षांच्या आतील मतदार

अकोले ५१,२०६

संगमनेर ५८,२०८

शिर्डी ५७,२२४

कोपरगाव ६४,५१४

श्रीरामपूर ६३,६११

नेवासा ५९,६८१

शेवगाव-पाथर्डी ७३,०२१

पारनेर ६६,३४०

नगर ४८,९२५

श्रीगोंदा ६५,१३७

कर्जत-जामखेड ६९,००८

राहुरी ६२,२२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com