Vegetable Prices
Vegetable Pricesagrowon

Vegetable Prices : संक्रातीला भाजीपाल्याचे दर वाढले; शेतकऱ्यांमध्ये समाधान, बोर, कांदा पात, मेथीची रेलचेल

Vegetable Rate : कांदा पात, वांगी, मेथी, वरणा आणि वाटाण्याला संक्रातीला महत्व असल्याने या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
Published on

Agriculture News : सध्या मकर संक्रांतीच्या सणामुळे भाजीपाला बाजारात जोरदार आवक वाढली आहे. दरम्यान संक्रातीच्या सणाला पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा पात, वांगी, मेथी, वरणा आणि वाटाण्याला संक्रातीला महत्व असल्याने या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला सणासुदीत का होईना किरकोळ दरवाढ मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

कांदा पात, मेथीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरूवातीलाच ५ ते १० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. ओला वाटाण्याला चांगला दर मिळत आहे परंतु कडधान्य बाजारात मात्र स्थिरता दिसून येत आहे. फळमार्केटमध्ये माल्टा, कलिंगड, अननस, मोसंबी, संत्री, बोरांची आवक वाढली आहे. तर सफरचंदही मोठ्या प्रमाणात येत आहे.

वाटाणा घाऊक बाजारात ५० रुपये किलो असून किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत दर गेला आहे. वांग्यालाही मागणी असली तरी आवक जास्त झाल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांगी, ढब्बू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याच्या दर स्थिर आहे. तर स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली काकडी हळूहळू सुरू झाली आहे. काकडीला किरकोळ बाजारात ८० रुपये किलोचा दर आहे.

फ्लॉवरच्या दरातही वाढ झाली असून वाल, बिनीसचे दर मात्र कमी झाले आहेत. कोथिंबिर पेंडीचे दर १५ वरून आता १० रुपयांवर आले आहेत. स्थानिक मका कणसाचा घाऊक बाजारात पाच रुपये दर आहे. शेवगा शेंगाच्या दरात घसरण झाली आहे.

Vegetable Prices
Vegetable Farming : आधुनिक पद्धतीने पिकविलेल्या भाज्याही तितक्याच चविष्ट!

फळमार्केट मध्ये कलिंगड, अननस, अंजीर, बोरे, स्टॉबेरी, द्राक्ष, माल्टा, मोसंबी, संत्री, सफरचंद, पेरूची रेलचेल पहावयास मिळत आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडाचे दर वीस ते तीस रुपये दर आहेत.

द्राक्षांचा ८० ते १२० रुपये किलोपर्यंत दर आहे. संत्री ५० तर सफरचंद १०० ते १६० रुपये किलोपर्यंत दर आहेत. तूरडाळ, हरभरा डाळींसह इतर डाळींच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. गोडेतेल, साखरेचे दर मात्र स्थिर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com